PNB Housing Finance Limited

एनएसई:

बीएसई:

अंतिम अपडेट:

()
सरासरी रेटिंग
शेअर करा
कॉपी

पहिल्यांदा होम लोन घेणार्‍या अर्जदारांसाठी संपूर्ण गाईड

give your alt text here

पहिल्यांदा होम लोन घेणार्‍या अर्जदारांसाठी संपूर्ण गाईड

घर खरेदी करणे आणि ते ही स्वतःच्या मालकीचे, हक्काचे म्हणजे आयुष्यातील महत्त्वाचा क्षण. यासाठी प्लॅनिंग महत्त्वाचे आहे, कुटुंबातील सदस्यांच्या गरजा, संभाव्य घराचा आणि संबंधित डेव्हलपरचा रिसर्च महत्त्वाचा आहे. एकदा हे पूर्ण झाले की, तुम्हाला तुमचे स्वप्नातील घर खरेदी करण्यासाठी फायनान्सची गरज लागते.

गरजांचे प्लॅनिंग आणि योग्य घराची निवड यासाठी नक्कीच वेळ लागतो, त्यामुळे तुम्ही समांतर पद्धतीने अन्य बाबींचा देखील विचार करायला हवा, जसे की हाऊसिंग फायनान्स कंपनी शोधणे जी तुम्हाला परवडणाऱ्या ईएमआय सह सहजपणे होम लोन प्रदान करू शकते. त्यापूर्वी, होम लोनचे विविध पैलू पाहूया:

होम लोन म्हणजे काय?

होम लोन हे हाऊसिंग फायनान्स कंपनीज किंवा बँकद्वारे तुमच्या घराच्या सिक्युरिटीसाठी ऑफर केलेले सिक्युअर्ड लोन आहे. घर खरेदी करणार्‍या किंवा घर बांधायची इच्छा असणार्‍या व्यक्तींना होम लोन देऊ केले जाते. प्रॉपर्टी लोनचे रिपेमेंट होईपर्यंत लेंडर (हाऊसिंग फायनान्स कंपनी किंवा बँक) ला सिक्युरिटी म्हणून मॉर्टगेज केली जाते. मान्य केलेल्या इंटरेस्ट सह जोपर्यंत लोन पूर्णपणे भरले जात नाही तोपर्यंत लेंडर कडे प्रॉपर्टीचे टायटल किंवा डीड असते. जर कस्टमरला लोन परतफेड करणे जमले नाही तर लेंडिंग इन्स्टिट्यूशन संबंधित प्रॉपर्टी विकून आपले पैसे प्राप्त करते.

विविध प्रकारचे होम लोन कोणते आहेत?

होम लोनद्वारे तुम्ही नवीन घर/फ्लॅट खरेदी किंवा बांधू शकता. तथापि, जर तुमच्याकडे यापूर्वीच घर असेल तर तुम्ही घरामध्ये आणखी जागा / खोली जोडण्यासाठी होम एक्सटेंशन लोन घेऊ शकता किंवा जर तुम्हाला तुमचे घर रिन्यूवल करायचे असेल तर होम इम्प्रुव्हमेंट लोन घेऊ शकता. तुम्ही घर निर्माण करण्यासाठी जमीन खरेदी करण्यासाठी देखील लोन घेऊ शकता.

 

लोन अगेंस्ट प्रॉपर्टी यापूर्वीच विद्यमान प्रॉपर्टी वर लोन घेणाऱ्या व्यक्तींसाठी देखील ऑफर केले जाते. कमी इंटरेस्ट रेटसह लोन घेण्यासाठी तुमचे विद्यमान हाय कॉस्ट लोन ट्रान्सफर करण्यासाठी होम लोनचे बॅलन्स ट्रान्सफर देखील शक्य आहे.

वाचायलाच हवे: होम लोनसाठी किमान किती डाउन पेमेंट आवश्यक आहे?

लोन घेता येणारी कमाल रक्कम किती आहे

लोन रक्कम ही सामान्यतः कस्टमरची रिपेमेंट क्षमता, त्याचा क्रेडिट स्कोअर, त्याचा उत्पन्नाची लेव्हल (किती ईएमआय तो/ती भरू शकेल) आणि होम लोनचा प्रकार (जसे नवीन खरेदी, रिनोव्हेशन, एक्स्टेन्शन किंवा लोन अगेंस्ट प्रॉपर्टी) यावर अवलंबून असते. सामान्यपणे आवश्यक लोन रकमेनुसार आणि उर्वरित शर्ती पूर्ण झाल्यास प्रॉपर्टीच्या किंमतीच्या 90% पर्यंत कमाल लोन देऊ केले जाते.

इंटरेस्ट रेट्सचे प्रकार काय आहेत

होम लोनसाठी इंटरेस्ट रेट्स दोन प्रकारचे आहेत – फिक्स्ड रेट किंवा फ्लोटिंग रेट. काही हाऊसिंग फायनान्स कंपन्या कर्जदाराच्या गरजांनुसार आंशिक निश्चित आणि/किंवा आंशिक फ्लोटिंग दर ऑफर करू शकतात.

 

फिक्स्ड रेट होम लोन - फिक्स्ड रेट लोन विशिष्ट कालावधीसाठी पूर्व-निर्दिष्ट इंटरेस्ट रेटवर येते, त्यानंतर ते फ्लोटिंग रेट वर परतफेड केले जाते

फ्लोटिंग रेट होम लोन– फ्लोटिंग रेट लोनच्या बाबतीत, लोन कालावधी मधील रेट बदलू शकतो कारण तो संदर्भ इंटरेस्ट रेटशी जोडला जातो. जो आर्थिक अनिवार्यतेच्या नुसार बदलतो.

होम लोनवरील टॅक्स लाभ कोणते आहेत?

होम लोनवर आकर्षक इन्कम टॅक्स लाभ आहेत आणि विस्तृतपणे तीन पार्ट्समध्ये वर्गीकृत केले जाऊ शकतात –

  1. स्वयं-स्वाधीन प्रॉपर्टीसाठी भरलेल्या इंटरेस्ट रेट वरील ₹200,000 कपात प्राप्तिकर कायदा 1961 च्या सेक्शन 24 अंतर्गत क्लेम केली जाऊ शकते
  2. इन्कम टॅक्स अॅक्टच्या 1961 कलम 80C अंतर्गत स्वयं-स्वाधीन असलेल्या प्रॉपर्टीसाठी मूळ रिपेमेंट वरील ₹150,000 कपात क्लेम केली जाऊ शकते.
  3. आर्थिक वर्ष 2016-17 नंतर होम लोन घेतले असल्यास "होम लोनवर इंटरेस्ट" म्हणून आणखी ₹50,000 टॅक्स लाभ क्लेम केला जाऊ शकतो. घराचे मूल्य ₹50 लाखांपेक्षा कमी असावे, होम लोन रक्कम ₹35 लाखांपेक्षा कमी असावी आणि लोन मंजूर होण्याच्या तारखेला टॅक्स प्रदात्याकडे कोणतीही प्रॉपर्टी नसावी.

आवश्यक डॉक्युमेंट्स कोणते आहेत

जर तुम्ही वेतनधारी व्यक्ती किंवा स्वयं-रोजगारित व्यावसायिक असाल तर होम लोनसाठी आवश्यक डॉक्युमेंट्स खालीलप्रमाणे–

वेतनधारी कर्मचारी स्वयं-रोजगारित/व्यावसायिक
फोटोसह रीतसर ॲप्लिकेशन फॉर्म फोटोसह रीतसर ॲप्लिकेशन फॉर्म
वयाचा पुरावा (पॅन कार्ड, पासपोर्ट, वैधानिक प्राधिकरणाचे इतर कोणतेही सर्टिफिकेट) वयाचा पुरावा (पॅन कार्ड, पासपोर्ट, वैधानिक प्राधिकरणाचे इतर कोणतेही सर्टिफिकेट)
रहिवासी पुरावा (पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, टेलिफोन बिल, रेशन कार्ड, इलेक्शन कार्ड, वैधानिक प्राधिकरणाचे इतर कोणतेही सर्टिफिकेट) रहिवासी पुरावा (पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, टेलिफोन बिल, रेशन कार्ड, इलेक्शन कार्ड, वैधानिक प्राधिकरणाचे इतर कोणतेही सर्टिफिकेट)
शैक्षणिक पात्रता - लेटेस्ट डीग्री शैक्षणिक पात्रता - लेटेस्ट डीग्री (व्यावसायिकांसाठी),
लेटेस्ट 3 महिन्यांची सॅलरी स्लिप बिझनेस प्रोफाईलसह बिझनेस अस्तित्वाचे सर्टिफिकेट आणि पुरावा,
मागील 2 वर्षांसाठीचा फॉर्म 16 चार्टर्ड अकाउंटंटद्वारे योग्यरित्या प्रमाणित/ऑडिट केलेल्या नफा आणि तोटा अकाउंट आणि बॅलन्स शीटसह मागील 3 वर्षांचा इन्कम टॅक्स रिटर्न्स (स्वत:चा आणि व्यवसायाचा),
मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट (सॅलरी अकाउंट) मागील 12 महिन्यांचे बँक अकाउंट स्टेटमेंट (स्वतःचे आणि व्यवसायाचे)
‘पीएनबी हाऊसिंग फायनान्स लि.’ च्या नावे प्रोसेसिंग फी चेक ‘पीएनबी हाऊसिंग फायनान्स लि.’ च्या नावे प्रोसेसिंग फी चेक
प्रॉपर्टीचे टायटल डॉक्युमेंट, मान्यताप्राप्त प्लॅनची फोटोकॉपी प्रॉपर्टीचे टायटल डॉक्युमेंट, मान्यताप्राप्त प्लॅन इ. ची फोटोकॉपी.

सर्व डॉक्युमेंट्सना सेल्फ अटेस्टेशन आवश्यक आहे.

वाचायलाच हवे: होम लोनवरील टॅक्स लाभ कोणते? त्यांचा लाभ कसा घ्यावा?

लोन पात्रता कॅल्क्युलेट कशी करावी

तुमची लोन पात्रता तुमचे वय, उत्पन्न स्तर, रिपेमेंट क्षमता (उत्पन्नाचे रेशिओ), तुमचे रिपेमेंट रेशिओ आणि सर्व क्रेडिट स्कोअरपेक्षा जास्त यावर अवलंबून असेल. तुम्ही तुमचे होम लोन पात्रता निकष तपासण्यासाठी या होम लोन कॅल्क्युलेटर चा प्रयत्न करू शकता.

घर ही सर्वात महत्त्वाची मालमत्ता आहे जी तुम्ही तुमच्या आयुष्यात खरेदी कराल ; या टिप्स तुम्हाला घराचे मालक होण्यास त्रासमुक्त करण्यास मदत करतील.

पीएनबी हाऊसिंग फायनान्स त्यांच्या क्लायंट्सना फिक्स्ड आणि फ्लोटिंग रेटमध्ये विविध कालावधीसाठी हाऊसिंग लोन्सची गतिशील श्रेणी ऑफर करते. आम्हाला तुम्हाला कळवण्यात आनंद होत आहे की आम्ही 7 दिवसांच्या आत तुमच्या लोन वर प्रक्रिया करतो कारण आम्हाला समजतो की तुम्ही तुमचे स्वप्नातील घर खरेदी करणे अधिक सर्वोत्तम बनू शकाल.

होम लोन मंजुरी, वेळ फक्त
3 मिनिटे, त्रास-मुक्त!

पीएनबी हाऊसिंग

जाणून घेण्यासाठी अन्य विषय

Request Call Back at PNB Housing
कॉल बॅक करा