घर खरेदी हा कदाचित एखाद्या व्यक्तीच्या आर्थिक जीवनातील सर्वात मोठा आर्थिक निर्णय आणि व्यवहार आहे. हा एक असा निर्णय आहे ज्याचा अनेक वर्षे प्रभाव पडतो. हा देखील एक व्यवहार आहे ज्यासाठी तुमच्या उत्पन्नाच्या खर्चाबाबत अनेक वर्षांसाठी प्लॅनिंग करावे लागते.
होम लोन ही दीर्घकालीन आर्थिक वचनबद्धता आहे जी सामान्यपणे 20 ते 30 वर्षांपर्यंत चालू राहते, ज्यादरम्यान आपल्या देशाच्या आर्थिक वातावरणानुसार इंटरेस्ट रेट्स बदलू शकतात. याचा विचार करून, होम लोन प्रदाता तुम्हाला इंटरेस्ट रेट्स संदर्भात दोन पर्याय देतात. एक फिक्स्ड रेट आहे आणि दुसरा फ्लोटिंग रेट आहे.
त्यांच्या नावातच स्पष्ट झाल्याप्रमाणे, फिक्स्ड रेट लोन विशिष्ट कालावधीसाठी पूर्व-निर्दिष्ट इंटरेस्ट रेटवर येते, त्यानंतर ते फ्लोटिंग रेटवर परतफेड केले जाते ; फ्लोटिंग रेट लोनच्या बाबतीत, लोन कालावधीमध्ये रेट बदलू शकतो कारण ते संदर्भ इंटरेस्ट रेटशी जोडलेले आहे जे आर्थिक अनिवार्यतेवर आधारित बदलते. प्रत्येकाचे स्वत:चे गुणधर्म आहेत आणि तुमच्या आवश्यकतेनुसार ते निवडता येईल.
आढावा पुढीलप्रमाणे:
फिक्स्ड रेट होम लोन
- पूर्वनिर्धारित कालावधीसाठी चढ-उतारांपासून सुरक्षा: अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते जेव्हा त्या स्थितीमुळे इंटरेस्ट रेट्स मध्ये वाढ होऊ शकते. फिक्स्ड रेट निवडल्याने तुम्हाला सुरुवातीला अशा चढ-उतारांसाठी कवच मिळेल आणि तुम्ही निश्चित कालावधीदरम्यान प्रत्येक महिन्याला निश्चित रकमेचा ईएमआय भराल. तथापि, फिक्स्ड टर्म संपल्यानंतर, तुमचा इंटरेस्ट रेट फ्लोटिंग प्लॅनमध्ये जाईल, उदा., जर तुम्ही 5-वर्षाचा फिक्स्ड टर्म प्लॅन निवडला असेल, तर 6 व्या वर्षापासून, तुमचे होम लोन सध्याच्या फ्लोटिंग इंटरेस्ट रेटच्या अधीन असेल. त्यामुळे तुमचे इंटरेस्ट फिक्स्ड केले जाते आणि तुम्हाला इंटरेस्ट रेट वाढीकडे लक्ष देण्याची गरज नसते
फ्लोटिंग रेट होम लोन
- सामान्यपणे स्वस्त: फ्लोटिंग रेट लोन सामान्यपणे थोडाफार कमी इंटरेस्ट रेट आकारतात कारण महागाई किंवा वाढीचा घटक इत्यादीसारख्या आर्थिक परिस्थितींवर चढ-उतार अवलंबून असते. लेंडर बाजार स्थितीनुसार रेट कमी-जास्त करतो. त्यामुळे कमी महागाई कालावधीदरम्यान फ्लोटिंग रेट सर्वात लाभदायक असू शकते.
- जेव्हा रेट कमी होतात तेव्हा कमी ईएमआय: जर होम लोन इंटरेस्ट रेट्स स्थिर असेल किंवा डाउनवर्ड ट्रेंडवर असेल तर तुम्ही फ्लोटिंग रेट लोनमध्ये पैसे सेव्ह करू शकता कारण तुम्हाला इंटरेस्ट रेट्स कमी होण्याचा लाभ होतो.
थोडक्यात:
तुम्हाला हवा असलेला लोन प्रकार तुमच्या गरजांवर अवलंबून असतो. कर्जदाराने त्याच्यासाठी/तिच्यासाठी सर्वोत्तम काय आहे याबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे. जर तुमची सर्वात महत्त्वाची चिंता सुरक्षितता आणि निश्चितता असेल तर तुम्ही इंटरेस्ट रेट प्रीमियमच्या किंमतीवर किंवा अन्यथा फिक्स्ड इंटरेस्ट रेट निवडू शकता
पीएनबी हाऊसिंग फायनान्स फिक्स्ड आणि फ्लोटिंग रेट दोन्ही लोन देऊ करते. फिक्स्ड रेट 3 वर्ष, 5 वर्ष आणि 10 वर्षाच्या टर्मसाठी लागू आहे, त्यानंतर इंटरेस्ट रेट ऑटोमॅटिकरित्या कन्व्हर्ट होतो