होम लोन्समुळे भारतातील लाखो लोकांचे आयुष्य सुलभ झाले आहे ही वस्तुस्थिती आहे व यात काही अतिशयोक्ती नाही. घराचे मालक होण्याचे किंवा रिअल इस्टेट प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या कोणासाठीही हा अत्यंत परवडणारा उपाय आहे. का? कारण होम लोन तुम्हाला मॅनेज करण्यास सुलभ ईएमआय मध्ये प्रॉपर्टीचा खर्च भरू देते. परंतु तुम्हाला तुमच्या लेंडरकडून लोन म्हणून संपूर्ण प्रॉपर्टीचा खर्च मिळतो का? तर उत्तर आहे नाही.
येथेच होम लोन डाउन पेमेंट येते. हा घर खरेदीदार म्हणून प्रॉपर्टी खरेदीसाठी तुम्हाला आगाऊ भरावा लागणारा खर्च आहे. उर्वरित प्रॉपर्टी खर्च होम लोन ईएमआय म्हणून भरावयाचा असतो.
या ब्लॉगमध्ये, आपण डाउन पेमेंट म्हणजे काय, होम लोनसाठी किमान डाउन पेमेंट किती आहे, डाउन पेमेंट मॅनेज करण्यासाठी टिप्स आणि अधिक याविषयी चर्चा करू.
होम लोन डाउन पेमेंट म्हणजे काय?
तुमच्या होम लोन डाउन पेमेंटचा तुमच्या होम लोन पात्रतेशी पूर्णपणे संबंध आहे.
होम लोन मंजूर करण्यापूर्वी, तुमचा लेंडर तुमचे होम लोन ॲप्लिकेशन आणि संबंधित डॉक्युमेंट्सची पूर्णपणे तपासणी करेल. लेंडर ज्या घटकांकडे पाहतो ते आहेत:
- अर्जदाराचे वय
- अर्जदाराचे उत्पन्न
- अर्जदाराचा क्रेडिट स्कोअर
- अर्जदाराचे विद्यमान लोन
- अर्जदाराचा व्यवसाय/बिझनेसचे स्वरुप
- अर्जदाराचे इन्कम टॅक्स रिटर्न
- प्रॉपर्टी मूल्य
तुम्ही तपासण्यासाठी होम लोन पात्रता कॅल्क्युलेटर आणि होम लोन ईएमआय कॅल्क्युलेटर वापरू शकता.
या घटकांनुसार, तुम्ही पात्र असलेल्या हाऊसिंग लोनची कमाल रक्कम लेंडर तुम्हाला सांगू शकेल. शेवटी, तुम्हाला होम लोनच्या स्वरूपात 100% प्रॉपर्टी मूल्य मिळणार नाही. प्रॉपर्टीच्या किमतीपैकी काही टक्केवारी तुम्हाला विक्रेत्याला आगाऊ पेमेंट करावी लागेल. याला घरावर डाउन पेमेंट किंवा प्रॉपर्टी खरेदीसाठी 'स्वत:चे योगदान' म्हणतात.
वाचायलाच हवे: होम लोनसाठी डाउन पेमेंट काय आहे?
होम लोनसाठी किमान किती डाउन पेमेंट आवश्यक आहे?
आरबीआय/एनएचबी च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बँका आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स प्रॉपर्टीच्या किंमतीनुसार 90% एलटीव्ही (लोन टू वॅल्यू) पर्यंत ऑफर करू शकतात.
- 30 लाखांपेक्षा कमी असलेल्या प्रॉपर्टीसाठी: कमाल 90% एलटीव्हीला अनुमती आहे
- 30 ते 75 लाखांच्या श्रेणीतील प्रॉपर्टीसाठी: कमाल 80% एलटीव्हीला अनुमती आहे
- 75 लाखांपेक्षा अधिकच्या प्रॉपर्टीसाठी: कमाल 75% एलटीव्हीला अनुमती आहे
याचा अर्थ होम लोन घेण्यासाठी घर खरेदीदाराला डाउन पेमेंट म्हणून बॅलन्स प्रॉपर्टी खर्च भरावा लागतो.
होम लोनसाठी किमान डाउन पेमेंट भरण्याचे लाभ
अर्थातच, होम लोनसाठी कमी डाउन पेमेंट भरणे खूपच वाजवी आणि लाभदायी वाटते. त्याचे काही लाभ येथे दिले आहेत:
- हे अधिक परवडणारे आहे.
- डाउन पेमेंटसाठी पैसे उभे करण्यासाठी तुम्हाला तुमचे महत्त्वाचे सेव्हिंग्स किंवा इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणात वापरण्याची गरज नाही.
- तुम्ही अतिरिक्त लिक्विड कॅश राखून ठेवू शकाल जी तुम्ही अन्य उच्च उत्पन्न देणाऱ्या मालमत्तांमध्ये इन्व्हेस्ट करू शकता.
तथापि, तुमचे डाउन पेमेंट जितके कमी असेल, तुमची होम लोन रक्कम अधिक असेल. याचा अर्थ असा की तुम्ही दीर्घ कालावधीसाठी जास्त इंटरेस्ट रक्कम भराल.
होम लोनसाठी मोठे डाउन पेमेंट भरण्याचे लाभ
जर तुम्ही करू शकत असाल तर आम्ही घरावर आर्थिकदृष्ट्या शक्य तितके डाउन पेमेंट करण्याची शिफारस करतो. अर्थात, ते तुमच्या सेव्हिंग्सच्या बदल्यात किंवा तुमची फायनान्शियल सिक्युरिटी जोखमीत टाकून करू नये. असे करण्याचे अनेक लाभ आहेत:
- तुमची होम लोन रक्कम कमी होईल जी शेवटी तुमचे एकूण दायित्व कमी करते.
- कमी होम लोन रकमेसह, तुम्हाला तुमच्या लेंडरकडून अधिक अनुकूल इंटरेस्ट रेट्स आणि कमी ईएमआय मिळण्याची शक्यता असते.
- तुम्ही तुमचे होम लोन अधिक जलद भरू शकता.
वाचायलाच हवे: तुमच्या होम लोनवरील इंटरेस्टचा बोजा कसा कमी करावा (4 सोप्या टिप्स)
निष्कर्ष
तुम्ही देय करावयाच्या आदर्श होम लोन डाउन पेमेंटसाठी कोणताही ढोबळ नियम नाही. हे सर्व तुमच्या आर्थिक क्षमतेवर अवलंबून असते. अर्थात, जर तुम्ही करू शकत असाल तर 30-40% डाउन पेमेंट केल्याने तुमचे होम लोन दीर्घकाळात अविश्वसनीयपणे परवडणारे ठरू शकते! म्हणून, तुम्ही लेंडरकडून नेहमीच डाउन पेमेंटच्या सर्वोत्तम संभाव्य रकमेवर सल्ला घेणे आवश्यक आहे. याने तुमचा आर्थिक भार सुलभ होईल.
पीएनबी हाऊसिंगमध्ये, आम्ही नेहमीच डाउन पेमेंटवरील तुमच्या शंकांचे उत्तर देण्यासाठी उपलब्ध आहोत आणि तुम्हाला आकर्षक इंटरेस्ट रेट वर सर्वात परवडणारे आणि विश्वसनीय होम लोन ऑफर मिळविण्यात मदत करतो. अधिक जाणून घेण्यासाठी आजच आमच्याशी संपर्क साधा!