कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी
विषयी
पेहेल फाऊंडेशन
पीएनबी हाऊसिंग फायनान्सचे ध्येय वंचित समुदायापर्यंत पोहोचणे आणि त्यांच्या विकासासाठी सहाय्यभूत होण्यासाठी प्रकल्पांची पूर्ती करणे आणि लाभार्थ्यांना विकासाच्या कक्षेत आणणे. पेहेल फाऊंडेशन, पीएनबी हाऊसिंग फायनान्सचा सीएसआर विभाग हे त्याच दिशेने डिझाईन केलेल्या सीएसआर कार्यक्रमांना अंमलबजावणी आणि मजबूत करण्यासाठी माध्यम म्हणून कार्य करतात. समाजातील वंचित घटकांना विकास आणि कल्याणाच्या सुनिश्चिततेसाठी आमचे 'प्रयत्न' आणि 'उपक्रम' यांना अधोरेखित करतात. अधिकाधिक व्यक्तींच्या आयुष्यात विकासाचा प्रकाश पोहोचविणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये, पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने 'पेहेल फाऊंडेशन' स्थापित केले आहे’. सीएसआर कार्यक्रमांची अंमलबजावणी आणि सशक्तीकरण करण्याचे माध्यम असेल. समाजातील वंचित घटकांना विकास आणि कल्याणाच्या सुनिश्चिततेसाठी आमचे 'प्रयत्न' आणि 'उपक्रम' यांना अधोरेखित करतात. अधिकाधिक व्यक्तींच्या आयुष्यात विकासाचा प्रकाश पोहोचविणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
पीएनबी हाऊसिंग
सीएसआर हस्तक्षेप
महिला सबलीकरणाच्या हेतूने, वंचित समुदायातील महिलांचा सर्वांगीण विकास आणि सशक्तीकरणाचे संकल्पचित्र आम्ही आखले आहे. महिलांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करणे, आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वयं-आत्मविश्वास प्रदान करणे आणि महिलांच्या आरोग्य आणि स्वच्छतेशी संबंधित आरोग्य समस्यांचे निराकरण करणे हे आमचे ध्येय आहे.
समर्थित/आरंभित महिला सबलीकरण प्रकल्प खालीलप्रमाणे आहेत:
- A. गेल्या आर्थिक वर्षात दोन नॅपकिन निर्मिती युनिटची उभारणी करण्यात आली. लखनौ मध्ये आणि गुजरात मधील वलसाड मध्ये दोन्ही प्रकल्प स्थित आहेत. जवळपासच्या गावातील 64 महिला या नॅपकिनचे उत्पादन, पॅकेजिंग आणि विक्री साठी कार्यरत आहे. तसेच महिला या नजीकच्या गावातील ग्रामीण महिलांमध्ये आरोग्य विषयक स्वच्छता आणि मासिक पाळी स्वच्छतेच्या बाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी कार्यशाळा आयोजनात सहभागी आहेत. आम्ही 200 गावांतील ग्रामीण महिलांपर्यंत पोहोचण्याचे टार्गेट ठेवले आहे.
- b. मसाले आणि लोणचे निर्मिती साठी तीन युनिट सक्रिय आहेत. उत्पादन, पॅकेजिंग आणि विक्री मध्ये 115 ग्रामीण महिला कार्यरत आहेत. सर्व महिला बचत गटाच्या माध्यमातून यामध्ये कार्यरत आहेत आणि प्राप्त नफ्याचे एकमेकींमध्ये सामाईक विभाजन करुन बिझनेस वाढी साठी उपयोजन केले जात आहे.
- C. 'गुणवत्तापूर्ण जीवनाची हमी' या ध्येयासह कोविड काळात स्थलांतरित झालेल्या व्यक्तींना मदत पोहोचविण्याच्या हेतूने प्रकल्पाची रचना करण्यात आली आहे. यामध्ये कन्स्ट्रक्शन क्षेत्रात कार्यरत असलेल्या 150 महिलांना प्रशिक्षित करुन त्यांना फॅशन इंडस्ट्री सोबत जोडण्यात आले. या प्रगत प्रशिक्षणासाठी जपान वरुन अत्याधुनिक शिलाई मशीन मागविण्यात आल्या होत्या. या प्रकल्पात कार्यरत महिला सध्या प्रति महिना ₹10,000 पर्यंत कमाई करीत आहेत.
- d. 420 कर्णबधिर महिलांसाठी 4 विविध व्यवसायांसाठी कौशल्य विकास प्रकल्पाची योजना आखण्यात आली आहे. मिक्सर ग्राइंडर दुरुस्ती, एलईडी दुरुस्ती, मोबाइल दुरुस्ती आणि इलेक्ट्रिकल हे व्यवसाय आहेत. प्रशिक्षणानंतर या स्त्रिया विशेष व्यवसायात निपुण होतील ज्यामुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यास मदत होईल.
- ई. ओडिशाच्या भुवनेश्वर येथील एलव्ही प्रसाद आय हॉस्पिटलमध्ये महिला कर्मचाऱ्यांच्या (10 वर्षांपर्यंतच्या) मुलांची काळजी घेण्यासाठी विशेष कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे महिलांना काम आणि कुटुंब यापैकी एकाची निवड करताना संघर्ष न करता सदैव काम करण्याची प्रेरणा मिळते. या उपक्रमानंतर यापूर्वी काम सोडलेल्या महिलांनी पुन्हा कामावर रुजू होण्यासाठी विचारणा करण्यास सुरुवात केली आहे.
- एफ. राजस्थानच्या गावांमध्ये 7 ग्रामीण केंद्रांमध्ये 120 ग्रामीण महिलांसाठी कौशल्य विकास प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. त्यांनी 6 महिन्यांचे प्रशिक्षण घेतले आणि ते पूर्ण झाल्यानंतर ते या प्रकल्पाद्वारे त्यांना प्रदान केलेल्या यंत्रमागांवर काम करतात. ते पुढे कार्पेटची विक्री करतात आणि सध्या कार्पेट निर्मिती क्षेत्रात चांगला नफा कमावत आहेत.
आरोग्य ही मूळ थीम असल्याने, आम्ही अशा प्रकल्पांची रचना करण्याचा प्रयत्न करतो जे चांगल्या आरोग्य सेवा, प्रगत आरोग्य पायाभूत सुविधा आणि वंचित समाजाला आरोग्य सेवांची चांगली पोहोच देण्याचे वचन देतात.
समर्थित / आरंभित सीएसआर प्रकल्प खालीलप्रमाणे आहेत:
- a. 6 पीएचसी (प्राथमिक आरोग्य केंद्र)/सीएचसी (सामुदायिक आरोग्य केंद्र) समर्थित होते. जिथे पायाभूत सुविधा पूर्णपणे सर्वोत्तम मानकांमध्ये बदलल्या गेल्या आहेत. यापैकी काही केंद्रांमध्ये अनेक वैद्यकीय आणि प्रयोगशाळा उपकरणे स्थापित केली गेली आहेत जसे की प्रगत प्रयोगशाळा आणि चाचणी मशीन इ.
- b. 2 सरकारी रुग्णालयांना पायाभूत सुविधांच्या सुधारणांसह अनेक वैद्यकीय आणि प्रयोगशाळा उपकरणे पुरवण्यात आली. त्यापैकी एक (ससून जनरल हॉस्पिटल, पुणे) ज्यामध्ये 4000 ओपीडी रुग्ण आणि 1500 इनडोअर रुग्ण आहेत. त्यांना पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा आणि प्रगत प्रयोगशाळा उभारण्यात आल्याने खूप मोठ्या प्रमाणावर मदत केली गेली आहे. ज्याद्वारे नियमित 500 चाचण्यांचे निदान केले जाते.
- c. एकूण कामगार लोकसंख्येला पर्याप्त सेवा पुरविण्याच्या हेतूने 4 ठिकाणी (दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई) 4 फिरते वैद्यकीय दवाखाने नियोजित आहेत. या फिरत्या दवाखान्यांच्या सहाय्याने झोपडपट्टी किंवा बांधकाम स्थळांवर जाऊन दवाखान्यांपर्यंत पोहोचू न शकणाऱ्या कामगारांना थेट आरोग्य विषयक लाभ प्रदान करणे शक्य ठरेल.
- d. रुग्णांना नजीकच्या आरोग्य केंद्रांपर्यंत नेण्यासाठी 2 रुग्ण वाहतूक बसेसची योजना करण्यात आली आहे. दुर्गम ग्रामीण भागात राहणाऱ्या आणि सहजासहजी आरोग्य सेवा केंद्रापर्यंत पोहोचणं शक्य न ठरणाऱ्या व्यक्ती या सुविधेच्या सहाय्याने थेट आरोग्य केंद्रांना भेटी देऊ शकतात.
- e. कर्णबधिर बालकांना 250 श्रवण यंत्रांचे वितरण करण्यात आले. ही श्रवणयंत्रे एकप्रकारे मुलांसाठी वरदानच ठरली आहे. या उपकरणांच्या सहाय्याने त्यांच्या बोलण्यात सुलभता येईल आणि सुलभपणे संवाद साधू शकतील.
शिक्षण क्षेत्रात आम्ही निवडकपणे अशा प्रकल्पांची निवड करतो. ज्यांच्याद्नारे प्रगत शिक्षण तंत्रज्ञान, उत्तम पायाभूत सुविधा, शिष्यवृत्ती आणि शिकण्यासाठी मदत यांचा समावेश करण्याद्वारे विद्यार्थ्यांना अधिक चांगला शिकण्याचा प्रवास आणि भवितव्य प्रदान करण्याचे वचन देतात.
समर्थित/सुरू केलेले प्रकल्प खालीलप्रमाणे आहेत:
- a. 4 शासकीय अंगणवाड्यांना उत्तम पायाभूत सुविधा, शैक्षणिक साहित्य, खेळण्याची जागा आणि खेळणी प्रदान करण्याद्वारे त्यांचा श्रेणीसुधार करण्यात आला. आणखी पाच अंगणवाडीतही असेच काम सुरू आहे. सर्व सुधारणा उपक्रमांमुळे अधिकाधिक मुलांना दररोज अंगणवाड्यांमध्ये येण्यास प्रोत्साहन मिळाले आहे.
- b. 2 शाळांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास, शिकण्याचे साधन आणि विद्यार्थ्यांसाठी माहितीपूर्ण वॉल आर्टसह शाळेचा कायापालट करण्यात आला आहे. नाविन्यपूर्ण खेळाचे क्षेत्र, ‘स्वच्छता वाहिनी’ या नावाने बसच्या आकारात बांधलेली स्वच्छतागृहे आणि खास जेवणाचे क्षेत्र अशाप्रकारच्या वैशिष्ट्यांमुळे सरकारी शाळांनी वेगळेपण निश्चित केले आहे. ज्यामुळे अधिकाधिक विद्यार्थी शाळा प्रवेशाकडे आत्कृष्ट होत आहे.
- c. 23 सरकारी ठिकाणी सोलर पॅनल बसविण्यात आले आहेत. ज्याद्वारे ग्रामीण खेड्यांमध्ये वीज जोडणी पोहोचली आहे. अशा शाळांमध्ये भारनियमन हे मोठे आव्हान आहे. विशेषत: उन्हाळ्याच्या काळात दिवसा वीजप्रवाह नसल्यामुळे विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत असे आणि अप्रत्यक्ष परिणाम उपस्थितीवर जाणवायचा.
- d. 47 सरकारी शाळांमध्ये ई-लर्निंग पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात आली आहे. जिथे विद्यार्थ्यांना अध्यापनासाठी ऑडिओ-व्हिज्युअल साधने उपलब्ध होती. 4500 विद्यार्थी आंतरक्रियात्मक शैक्षणिक साधनांचा दैनंदिन लाभ घेतात. ई-लर्निंग पायाभूत सुविधांमुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता मोठ्या प्रमाणात उंचावली आहे.
- ई. समाजातील सर्व विभागांतील वंचित विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांचे अभ्यास पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी शिष्यवृत्ती प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. ही शिष्यवृत्ती संपूर्ण भारतातील 400 विद्यार्थ्यांना दिली जाईल.
- f. झारखंडच्या ग्रामीण भागातील अनेक आदिवासी खेड्यांतील विद्यार्थ्यांना नजीकच्या शाळेत पोहोचण्यासाठी 1 स्कूल बसला मदत करण्यात आली आहे. कौटुंबिक कमाईमुळे आणि बहुतेक दुर्गम भागातून आलेल्या आदिवासी शाळेतील मुलांना शाळेत जाण्यासाठी वाहतुकीची सोय नाही. स्कूल बसची तरतूद त्यांना शाळेत जाण्याच्या अडचणींवर मात करण्यास मदत करेल आणि त्यांना समान शैक्षणिक संधी उपलब्ध करून देईल.
- g. 'स्टेम' (विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी गणित) अध्ययन उपक्रम 20 शाळांमध्ये सुरू आहे. हा प्रकल्प विविध व्यावहारिक उपक्रम, कार्यशाळा, प्रत्यक्ष सराव आणि अनुभवात्मक मजेदार शिक्षण आयोजित करून दर्जेदार स्टेम शिक्षण देईल ज्यामुळे विद्यार्थ्यांना विविध संकल्पना आणि कौशल्ये शिकण्यास मदत होईल. हे संगणकीय विचार, समस्या सोडवण्याची कौशल्ये, सर्जनशील विचार, तार्किक युक्तिवाद, चांगले निर्णय घेणे आणि चांगली निरीक्षण शक्ती यासारखी नाविन्यपूर्ण कौशल्ये वाढवेल.
पर्यावरणाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि पुन्हा समाजाला परत करण्यासाठी, आम्ही पुनर्भरण, पुनर्वापर आणि नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनावर काम करण्याची जबाबदारी घेतली. ज्यामुळे कचऱ्यामुळे होणारे प्रदूषण कमी होईल आणि लाभार्थ्यांना शुद्ध पाणी मिळेल.
समर्थित/सुरू केलेले प्रकल्प खालीलप्रमाणे आहेत:
- a. वार्षिक 27.22 दशलक्ष लीटर पाणी उपसा करण्याची क्षमता असलेल्या 1606 ग्रामस्थांच्या लोकसंख्येचा फायदा करून दोन तलावांचा सुरवातीपासून विकास करण्यात आला. याचा फायदा त्यांना शेती, बागायती आणि जनावरांसाठी पाण्याच्या उपलब्धतेत होईल ज्यामुळे गावकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल.
- b. राजस्थानमधील गोवला आणि माल की टूस या दोन गावांमध्ये घरोघरी पिण्याच्या पाण्याची सुरक्षित व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. या 2 गावातील 944 ग्रामस्थांना आयुष्यात पहिल्यांदाच थेट पाण्याच्या पाईपलाईन द्वारे सुरळीत पाणी पुरवठा होत आहे. या प्रकल्पात सोलर वॉटर लिफ्टिंग सिस्टिम सह ओव्हरहेड टाकी बांधण्यात आली असून ही यंत्रणा शाश्वत कार्यान्वित होण्यासाठी पाणी समितीची स्थापना करण्यात आली आहे.
- c. एका तासात 1000 लीटर पाणी वितरीत करण्याच्या क्षमतेचे तीन आरओ प्लांट अशा ठिकाणी उभारण्यात आले आहेत. जिथे पाण्याची पुरेशी उपलब्धता आणि पाण्याची गुणवत्ता ही मोठी समस्या ठरली आहे. 3 प्लांट मधून एकत्रितपणे दरवर्षी 75000 लोकसंख्येला थेट फायदा प्राप्त होतो.
- d. प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापनामध्ये, सार्वजनिक ठिकाणी 16 प्लास्टिक बॉटल क्रशर बसवण्याचे काम सुरू आहे. जिथे मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा निर्माण होतो. या प्रकल्पाद्वारे आमचा उद्देश या मशीनमधील प्लास्टिक पेट बाटल्यांची विल्हेवाट लावण्यासाठी लोकांना प्रवृत्त करण्याचे उद्दिष्ट आहे. ज्यांचे मशीनच्या सहाय्याने क्रशिंग केले जाईल आणि रिसायकलिंगच्या हेतूने पुन्हा रिसायकलिंग युनिटकडे पाठविल्या जातील. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात कचरा खड्डे भरण्यासाठी वापरला जाईल आणि थेट रिसायकलिंग साठी रवाना केला जाईल.
पीएनबी हाऊसिंग
कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी
व्हिजन स्टेटमेंट
पीएनबी हाऊसिंग फायनान्स साठी कॉर्पोरेट सामाजिक दायित्व हा एक जीवन मार्ग आहे. आम्ही आमच्या बिझनेस फिलॉसॉफी आणि ऑपरेशन्समध्ये कॉर्पोरेट जबाबदारीच्या तत्त्वांचा समावेश केला आहे. आतापर्यंतच्या आमच्या प्रवासात, आम्ही शाश्वत बिझनेस मॉडेलची निर्मिती केली आहे आणि भाग धारकांसाठी मूल्य निर्मिती केली आहे. आम्हाला विश्वास आहे की आम्ही वंचितांचे जीवन सुधारण्यात आणि राष्ट्र उभारणीसाठी आमच्या विनम्र सामूहिक प्रयत्नांना बळकटी देऊ शकू.
मिशन स्टेटमेंट
सर्वसमावेशक स्वरूपाच्या हस्तक्षेपांची योजना करणे आणि मोठ्या प्रमाणावर समाजाची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करणे. हस्तक्षेपाद्वारे केवळ थेट लाभार्थ्यांच्या विकासावर परिणाम होणार नाही. तर प्रभाव क्षेत्राच्या परिघातील उपस्थित असलेल्या लोकांच्या जीवनाची गुणवत्ता वाढवण्याचाही प्रयत्न केला आहे.