नवीन वर्ष म्हणजे कुटुंब आणि मित्रांसोबत आनंद साजरा करण्याची वेळ जवळ आली आहे. तुमच्या प्रियजनांना भेटवस्तू देऊन ते तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत हे त्यांना कळवण्याची हीच वेळ आहे. परंतु ही वेळ चॉकलेट्स, मिठाई आणि कपड्यांवर पैसे खर्च करण्याऐवजी त्यांना सिक्युरिटी देण्याची नाही का?? सिक्युरिटी म्हणजे कॅमेरा सिक्युरिटी नाही बरं का, तर ही आहे पैशांची सिक्युरिटी. तुम्ही ते कसे करू शकता?? तुम्ही निवडू शकता अशा अनेक फायनान्शियल स्कीम आहेत, परंतु दीर्घकालीन स्वरुपात फिक्स्ड डिपॉझिट इन्व्हेस्टमेंट रिस्क आणि रिटर्न दरम्यान योग्य बॅलन्स ऑफर करतात.
तुम्हाला फक्त तुमच्या प्रियजनांच्या नावावर एफडी खरेदी करायचे आहे आणि जेव्हा डिपॉझिट मॅच्युअर होईल तेव्हा त्यांना उत्पन्न मिळण्याची हमी असल्याची खात्री करायची आहे. परंतु, तुम्ही हे करण्यापूर्वी, तुम्हाला माहित असाव्यात अशा काही टिप्स येथे आहेत:
दीर्घ कालावधीमुळे तुम्हाला जास्त इंटरेस्ट रेट मिळेल
एफडी गिफ्ट करण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे डिपॉझिट केलेल्या रकमेतून तुमचे प्रियजन जास्त इंटरेस्ट कमवत असल्याची खात्री करणे. तुम्ही दीर्घ कालावधी निवडू शकता! तुम्ही स्वतःच फरक ठरवू शकता – पीएनबी हाऊसिंगद्वारे ऑफर केलेल्याएफडी इंटरेस्ट रेट्सची श्रेणी बारा महिन्यांसाठी 8.05%* आणि साठ महिन्यांसाठी 8.45%* आहे. हा जवळपास 40 बीपीएसचा फरक आहे आणि अंतिम करण्यापूर्वी तुम्ही तो विचारात घेणे आवश्यक आहे.
वाचायलाच हवे: फिक्स्ड डिपॉझिट अकाउंटची वैशिष्ट्ये आणि लाभ काय आहेत?
तुम्ही ज्यांना भेटवस्तू देणार त्यांच्या गरजांनुसार एफडी भेट द्या
जर तुम्ही प्राप्तकर्त्याच्या किंवा ज्याला भेटवस्तू देत आहात त्याच्या गरजा समजून घेऊ शकलात तर नववर्ष दिवस आनंदमय बनवणे सोपे आहे! व्यक्तीला नियमित उत्पन्नाचा स्त्रोत आवश्यक आहे का?? जर असेल तर, गैर-संचयी एफडी निवडा ज्यामध्ये तुम्ही डिपॉझिटर म्हणून नाव दिलेली व्यक्ती मासिक, सहा-मासिक किंवा वार्षिक पेमेंट मिळवू शकते . एक निश्चित उत्पन्नाचा स्त्रोत संपूर्ण वर्ष उत्साहपूर्ण बनवेल. इतर पर्याय हा संचयी पर्याय आहे, जिथे कालावधीसाठी रक्कम जमा केली जाते आणि मॅच्युरिटी वेळी इंटरेस्ट कमवले जाते.
ऑफरच्या अटी व शर्ती समजून घ्या
एफडी बनवण्यासाठी आणि भेटवस्तू म्हणून देण्यासाठी तुम्हाला पीएनबी हाऊसिंगच्या काही अटी व शर्ती आहेत, त्या पाळाव्या लागतील. उदाहरणार्थ, जर तुम्ही संचयी एफडी निवडत असाल तर त्यासाठी फिक्स्ड डिपॉझिट किमान रक्कम म्हणून ₹10,000 आवश्यक आहेत. प्री-मॅच्युअर विद्ड्रॉल आणि लोन सुविधेसारख्या घटकांचा विचार करा, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत भेटवस्तू वापरता येईल. तुम्हाला लागू गिफ्ट टॅक्स आणि डिपॉझिटर म्हणून नाव द्यायचे असलेल्या भेटवस्तू स्वीकारणार्याची पात्रता देखील विचारात घेणे आवश्यक आहे.
जास्त विचार न करता ज्येष्ठ नागरिकांना एफडी गिफ्ट करा
ज्येष्ठ नागरिकांसाठी एक प्रमुख आवश्यकता म्हणजे स्थिर उत्पन्न स्त्रोत आहे. आणि, भारतात ज्येष्ठ नागरिक एफडी लाभ अनेक आहेत. ते उच्च इंटरेस्ट रेट्ससाठी पात्र असल्याने आणि रिटर्नची हमी असल्यामुळे ते उत्तम भेटवस्तू पर्याय आहेत. पीएनबी हाऊसिंग ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.25% अधिक एफडी इंटरेस्ट रेट्स ऑफर करते.
वाचायलाच हवे: फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट ऑनलाईन कसे उघडावे?
इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी सर्व शंकाचे निरसन करून घ्या
क्रिसिल रेटिंग पाहण्यास विसरू नका. जर कोणतीही शंका असेल तर तुम्ही तपशील समजून घेण्यासाठी कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हना कॉल करू शकता किंवा नजीकच्या पीएनबी हाऊसिंग ब्रँच ला भेट देऊ शकता. तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनांसाठी हा अनुभव आनंददायी करण्यासाठी एफडी अंतिम करण्यापूर्वी तुमचे संशोधन करा.
आता तुम्हाला फिक्स्ड डिपॉझिटमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी आवश्यक टिप्स माहित आहेत, तर पुढे जाऊन प्रियजनांना आर्थिक स्थिरतेचा आनंद द्या जो 2023 च्याही पुढे टिकेल!