PNB Housing Finance Limited

एनएसई:

बीएसई:

अंतिम अपडेट:

()
सरासरी रेटिंग
शेअर करा
कॉपी

तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी फिक्स्ड डिपॉझिटचे लाभ

give your alt text here

फिक्स्ड डिपॉझिट हे सर्व वयोगटातील लोकांसाठी विशेषत: ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या पालकांसाठी एक सर्वात प्राधान्यित इन्व्हेस्टमेंट मार्ग आहे. प्राथमिक कारणे म्हणजे त्यात किमान जोखीम असतात आणि अल्प आणि दीर्घकालीन दोन्ही ध्येये पूर्ण करण्यास मदत करतात.

ज्येष्ठ नागरिक, विशेषत: निवृत्त व्यक्ती, त्यांच्या आवश्यकतेनुसार मासिक, तिमाही, अर्ध-वार्षिक किंवा वार्षिक आधारावर त्यांच्या डिपॉझिटवर इंटरेस्ट मिळवू शकतात. एफडी ऑटो रिन्यूअलच्या पर्यायासह येतात ज्यामुळे कस्टमरना डिपॉझिटच्या त्रासमुक्त रिन्यूवलची सुविधा मिळते. यामुळे सुरुवातीला इन्व्हेस्ट केलेल्या कॉर्पसची पुन्हा इन्व्हेस्टमेंट होऊ शकते, ज्यामुळे त्यांना नियमित उत्पन्न सुरू ठेवण्यास मदत होते. हे ज्येष्ठ नागरिकांना निवृत्तीनंतरच्या वर्षांमध्ये सुरक्षित आणि हमीपूर्ण रिटर्न मिळवून देते.

उदाहरणासह समजून घेवू या:

निवृत्तीच्या वेळी, बहुतांश निवृत्त व्यक्तींना ग्रॅच्युईटी, प्रॉव्हिडंट फंड, ॲरिअर्स इत्यादींच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात पैसे मिळतात. आयुष्यभर कष्टाने कमावलेले पैसे जोखीमदार इंस्ट्रुमेंट्समध्ये इन्व्हेस्ट करण्याऐवजी किंवा हे फंड सेव्हिंग्स अकाउंटमध्ये ठेवण्याऐवजी, फिक्स्ड डिपॉझिटमध्ये धोरणात्मकरित्या इन्व्हेस्ट करणे त्यांना नियमित उत्पन्न कमविण्यास मदत करू शकते. मासिक आधारावर समर्पित उत्पन्न काही नियमित आवश्यकता आणि अनपेक्षित खर्च पूर्ण करण्यात मदत करू शकते.

खालील उदाहरण हे एका ज्येष्ठ नागरिकाचे उदाहरण आहे ज्यांचा एफडी मध्ये ₹20 लाखांचा रिटायरमेंट कॉर्पस इन्व्हेस्ट करण्याचा प्लॅन आहे.

आपण या इन्व्हेस्टमेंटद्वारे मासिक किती पैसे कमवले जातील ते पाहूया:

इंटरेस्ट रेट (आरओआय)

8.4% p.a.

Principal (INR)

20,00,000

Term

5 years

 

कमवलेला इंटरेस्ट (₹)

एकूण

मासिक

8,40,920

14,268*

मॅच्युरिटी रक्कम (₹)

20,00,000

*नमूद केलेली रक्कम केवळ स्पष्टीकरणाच्या हेतूसाठी आहे आणि निवडलेल्या आरओआय आणि कालावधीनुसार बदलू शकते.

संचयी डिपॉझिट पर्याय देखील आहेत ज्यामध्ये इंटरेस्टचा भाग प्रिन्सिपल रकमेसह एकत्रित केला जातो, ज्यामुळे इन्व्हेस्टरना एकरकमी मॅच्युरिटी रक्कम मिळते.

पालक त्यांच्या मुलांसाठी त्यांचे उच्च शिक्षण, लग्न, नवीन कौशल्य ट्रेनिंग यासारख्या अल्प आणि दीर्घकालीन ध्येयांची पूर्तता करण्यासाठी आणि अचानक आणि अनपेक्षित खर्च भागवण्यासाठी पैशांची रक्कम इन्व्हेस्ट करू शकतात. पालक प्रत्यक्षात मॅच्युरिटी रक्कम कधी हवी आहे यावर अवलंबून फिक्स्ड डिपॉझिट चा कालावधी निवडू शकतात. विविध आवश्यकतांसाठी एकापेक्षा जास्त एफडी उघडले जाऊ शकतात, समजा एक उच्च शिक्षणासाठी 10 वर्षांच्या मॅच्युरिटी उद्दिष्टासह, दुसरे नजीकच्या भविष्यातील गरजांसाठी 2 किंवा 3 वर्षांच्या मॅच्युरिटीसह.

एफडी म्युच्युअल फंडमधील इन्व्हेस्टमेंट प्रमाणे नसून त्यात रिटर्नवर कोणतीही घट नाही. एफडी उघडताना ऑफर केलेला इंटरेस्ट रेट मॅच्युरिटीपर्यंत तसाच राहील आणि आर्थिक अस्थिरता किंवा कंपनीच्या पॉलिसीनुसार बदलत नाही. उदाहरणार्थ, 8% प्रति वर्ष वर 2 वर्षाच्या एफडीमध्ये डिपॉझिटच्या संपूर्ण कालावधीत त्याच रेटने इंटरेस्ट मिळणे सुरू राहील.

या कारणांसाठी, नियमित उत्पन्न कमविण्यासाठी किंवा तुमच्या फायनान्शियल गरजांनुसार तसेच अपेक्षित आणि अनपेक्षित खर्च पूर्ण करण्यासाठी फिक्स्ड डिपॉझिट हा सर्वोत्तम इन्व्हेस्टमेंट पर्याय आहे.

होम लोन मंजुरी, वेळ फक्त
3 मिनिटे, त्रास-मुक्त!

पीएनबी हाऊसिंग

जाणून घेण्यासाठी अन्य विषय

Request Call Back at PNB Housing
कॉल बॅक करा