कंपनी फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) सामान्य बँक डिपॉझिटपेक्षा जास्त रिटर्न रेट ऑफर करू शकतात. तुमच्या पोर्टफोलिओच्या विविधतेचा भाग म्हणून, कंपनी एफडी मध्ये इन्व्हेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो. परंतु तुम्ही इन्व्हेस्ट करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे
तुम्ही कंपनी एफडी निवडण्यापूर्वी विचारात घेण्यासाठी आवश्यक असलेल्या 5 गोष्टी आहेत:
- क्रेडिट रेटिंग: रेटिंग एजन्सीद्वारे नियुक्त केले जाते, जे डिपॉझिट स्वीकारत असलेल्या कंपनीची क्रेडिट पात्रता पाहते. जेव्हा तुम्ही कंपनी डिपॉझिट निवडता, तेव्हा रेट न केलेली फिक्स्ड डिपॉझिट निवडू नका. भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय)ने नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी (एनबीएफसी) डिपॉझिटसाठी डिपॉझिट जारी करण्यापूर्वी किमान रेटिंग असणे अनिवार्य केले आहे. तुम्ही एएए रेटिंग असलेल्या स्कीमचा विचार करावा.
- पार्श्वभूमी: तुम्ही कंपनीच्या पार्श्वभूमीचा विचार करणे अपरिहार्य आहे. तुम्ही रिपेमेंट हिस्टरी आणि अशा प्रस्थापित कंपन्यांची प्रतिष्ठा शोधू शकता आणि सुरक्षित कंपनी डिपॉझिट निवडण्यासाठी तुमच्या फायनान्शियल सल्लागाराचे मार्गदर्शन वापरू शकता.
- रोकडसुलभता: कंपनी एफडी मध्ये लिक्विडिटीचा घटक असतो ज्यामुळे तुम्ही एका कालावधीनंतर विद्ड्रॉ करू शकता. लॉक-इन कालावधी 3 महिन्यांपर्यंत कमी असू शकतो. जर तुम्ही प्री-मॅच्युअर विद्ड्रॉल केले तर खालील दंड लागू होतात:
इन्व्हेस्टरची कॅटेगरी आगाऊ पैसे काढणे देय व्याज आगाऊ पैसे काढणे देय व्याज वैयक्तिक इन्व्हेस्टर 3महिन्यांनंतर पण 6 महिन्यांच्या आधी 4 टक्के 6 महिन्यांनंतर परंतु मॅच्युरिटीच्या तारखेपूर्वी पीरियड डिपॉझिटसाठी पब्लिक डिपॉझिट वरील इंटरेस्ट पेक्षा 1 टक्के कमी. अन्य इन्व्हेस्टर 3महिन्यांनंतर पण 6 महिन्यांच्या आधी काहीच नाही 6 महिन्यांनंतर परंतु मॅच्युरिटीच्या तारखेपूर्वी पीरियड डिपॉझिटसाठी पब्लिक डिपॉझिट वरील इंटरेस्ट पेक्षा 1 टक्के कमी. - इंटरेस्ट पेमेंट: तुम्ही मासिक, तिमाही, अर्ध-वार्षिक किंवा वार्षिक इंटरेस्ट पेमेंट प्राप्त करणे निवडू शकता. कृपया लक्षात घ्या की इंटरेस्ट पेमेंटच्या फ्रिक्वेन्सीनुसार इंटरेस्ट रेट बदलू शकतो.
- सुविधा: कंपनी फिक्स्ड डिपॉझिट डिपॉझिटरना अनेक सुविधा ऑफर करतात. यापैकी काही आहेत:
नॉमिनेशन: तुम्ही डिपॉझिटच्या मॅच्युरिटीपूर्वी तुमच्या मृत्यूच्या बाबतीत तुमच्या डिपॉझिटची रक्कम प्राप्त करणारा नॉमिनी नियुक्त करू शकता.
सममूल्य एन्कॅशमेंट: सममूल्य चेक प्राप्त करून तुम्ही तुमचे इंटरेस्ट पेमेंट प्राप्त करू शकता किंवा तुमचे एफडी एनकॅश करू शकता.
एफडी सापेक्ष लोन्स: तुमच्या कंपनी फिक्स्ड डिपॉझिटवर डिपॉझिट रकमेच्या 75 टक्के पर्यंत लोन घेतले जाऊ शकते.
वाचायलाच हवे: कॉर्पोरेट फिक्स्ड डिपॉझिट – लाभ, टॅक्स आणि सुरक्षितता
जर डिपॉझिटरने डिपॉझिट जारी करणाऱ्या कंपनीच्या पार्श्वभूमी आणि कंपनीच्या क्रेडिट पात्रतेच्या संदर्भात काळजीपूर्वक अभ्यास केला आणि योग्यरित्या संशोधन केले तर कंपनी फिक्स्ड डिपॉझिट सुरक्षित असतात.
पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ही 2 दशकांहून अधिक जुनी डिपॉझिट घेणारी कंपनी आहे. कंपनी पंजाब नॅशनल बँककडून त्यांचे पालकत्व प्राप्त करते जे मार्केटमधील प्रसिद्ध नाव आहे.
कंपनीच्या फिक्स्ड डिपॉझिटला क्रिसिल द्वारे एफएएए रेटिंग दिले जाते, जे रेटिंग एजन्सीने दिलेले सर्वोच्च सुरक्षा रेटिंग आहे.