PNB Housing Finance Limited

एनएसई:

बीएसई:

अंतिम अपडेट:

()
सरासरी रेटिंग
शेअर करा
कॉपी

फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट ऑनलाईन कसे उघडावे?

give your alt text here

तुम्ही तुमचे सेव्हिंग्स किंवा करंट अकाउंट वापरून तुमच्या बँकमध्ये नवीन एफडी अकाउंट उघडण्याच्या प्रोसेसबद्दल कदाचित परिचित असाल. परंतु, जेव्हा नवीन कॉर्पोरेट फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट उघडण्याची वेळ येते, तेव्हा प्रोसेस वेगळी असते. बँक ब्रँचमध्ये, जेथे तुम्ही तुमचे अकाउंट मेंटेन करता, तुम्हाला फक्त एक भरलेला ॲप्लिकेशन फॉर्म आणि नवीन एफडी सर्टिफिकेट मिळवण्यासाठी चेक सबमिट करणे आवश्यक आहे. परंतु, पीएनबी हाऊसिंग सारख्या एचएफसी मध्ये, फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट उघडण्याची प्रक्रिया वैयक्तिक आणि गैर-वैयक्तिक एफडी दोन्हींसाठी थोडी वेगळी आहे.

वैयक्तिक फिक्स्ड डिपॉझिटसाठी आवश्यक डॉक्युमेंट्स

  • अलीकडील एक कलर पासपोर्ट साईझ फोटो
  • पॅन कार्डची स्वयं-साक्षांकित कॉपी
  • मतदान-ओळखपत्र किंवा आधार कार्ड इ. सारख्या ॲड्रेसच्या पुराव्याची स्वयं-साक्षांकित कॉपी.

वैयक्तिक नसलेल्या फिक्स्ड डिपॉझिटसाठी आवश्यक डॉक्युमेंट्स

बिगर-वैयक्तिक मध्ये ट्रस्ट, क्लब, असोसिएशन, पब्लिक/प्रायव्हेट लि. कंपन्या, को-ऑपरेटिव्ह सोसायटी, को-ऑपरेटिव्ह बँक आणि पार्टनरशिप फर्म यांचा समावेश होतो. एफडी नवीन अकाउंट उघडण्यासाठी, संस्थेला सर्व अधिकृत व्यक्तींच्या नमुना स्वाक्षरीसह स्थापना आणि रजिस्ट्रेशनचे सर्व कायदेशीर डॉक्युमेंट्स सबमिट करणे आवश्यक आहे. एफडी अकाउंटसाठी आवश्यक इतर सामान्य डॉक्युमेंट्स:

  • व्यक्तीच्या पॅन कार्डची कॉपी
  • व्यक्तीच्या ॲड्रेसच्या पुराव्याची कॉपी
  • अधिकृत व्यक्तींचा नवीनतम कलर पासपोर्ट साईझ फोटो, पॅन कार्ड आणि ॲड्रेस पुरावा

फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट उघडण्याची प्रक्रिया

जर तुमच्याकडे तुमच्या नजीक पीएनबी हाऊसिंग ब्रँच असेल तर ॲप्लिकेशन फॉर्म कलेक्ट करण्यासाठी ब्रँचला भेट द्या. किंवा, तुम्ही कंपनीच्या प्रतिनिधीकडून घरपोच असिस्टन्स मिळविण्यासाठी तुमचे नाव, संपर्क नंबर, ईमेल, शहर आणि एफडी रक्कम यासारखे तपशील शेअर करून ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता

वाचायलाच हवे: फिक्स्ड डिपॉझिट अकाउंटची वैशिष्ट्ये आणि लाभ काय आहेत?

पीएनबी हाऊसिंगसह फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट उघडण्याची स्टेप-निहाय प्रक्रिया

स्टेप 1

आवश्यक तपशिलासह ॲप्लिकेशन फॉर्म अचूकपणे भरा. एफडी ॲप्लिकेशन फॉर्म भरताना लक्षात घेण्यासाठी खाली महत्त्वाचे मुद्दे आहेत:

  • कोणत्याही त्रुटीशिवाय अर्जदाराचे नाव, ॲड्रेस, पॅन आणि बँक तपशील असे तुमचे बेसिक तपशील अचूकपणे भरा
  • महिन्यांमध्ये फिक्स्ड डिपॉझिट कालावधी
  • पेमेंट तपशील (चेक, ड्राफ्ट, आरटीजीएस/एनईएफटी, यूटीआर नं.)
  • डिपॉझिट पर्याय, संचयी किंवा गैर-संचयी (मासिक/तिमाही/अर्ध-वार्षिक/वार्षिक)
  • रिपेमेंट सूचना (पहिला अर्जदार, पहिला अर्जदार किंवा उत्तरजीवी)
  • टॅक्सेशन सूचना
  • एफडी सर्टिफिकेट पाठविण्याची पद्धत (पोस्ट/कुरिअर/हाताने,/ब्रोकरद्वारे)
  • दुसऱ्या पेजवर, रिपेमेंट आणि नॉमिनी तपशिलासाठी बँक तपशील योग्यरित्या भरा
  • तुमचा नवीनतम कलर पासपोर्ट साईझ फोटो जोडा आणि त्यावर साईन करा
  • आणि शेवटी, ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये नमूद केलेल्या ठिकाणी तुमची साईन करा

स्टेप 2

अर्जदारांच्या केवायसी दस्तऐवजांच्या (पॅन कार्ड, आधार, मतदान ओळखपत्र) सर्व स्वयं-साक्षांकित कॉपींची व्यवस्था करा, ज्या तुम्ही सबमिट करणार आहात.

स्टेप 3

आता नजीकच्या पीएनबी हाऊसिंग ब्रँचमध्ये योग्यरित्या भरलेला ॲप्लिकेशन फॉर्म, केवायसी डॉक्युमेंट्स आणि चेक/ड्राफ्ट सबमिट करा. जर तुम्ही घरपोच असिस्टन्स निवडले असेल तर तुम्ही कंपनीच्या प्रतिनिधीला डॉक्युमेंट्स सबमिट करू शकता.

स्टेप 4

ॲप्लिकेशन फॉर्म आणि केवायसी डॉक्युमेंट्सच्या प्रमाणीकरणानंतर, तुमची एफडी बुक केली जाईल आणि सर्टिफिकेट तुमच्या दिलेल्या ॲड्रेसवर पाठवले जाईल. तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरही एसएमएस कन्फर्मेशन पाठवले जाईल.

वाचायलाच हवे: तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी फिक्स्ड डिपॉझिटचे लाभ

पीएनबी हाऊसिंग फिक्स्ड डिपॉझिटचे फीचर

  • उच्च सुरक्षितता मानक (क्रिसिल एफएए+/स्थिर)
  • प्रति फायनान्शियल वर्ष ₹5,000 पर्यंत इंटरेस्ट उत्पन्नावर कोणतेही टीडीएस नाही
  • डिपॉझिटवर लोन सुविधा
  • अनिवार्य 3 महिन्यांच्या लॉक-इन कालावधीनंतर प्री-मॅच्युअर विद्ड्रॉल
होम लोन मंजुरी, वेळ फक्त
3 मिनिटे, त्रास-मुक्त!

पीएनबी हाऊसिंग

जाणून घेण्यासाठी अन्य विषय

Request Call Back at PNB Housing
कॉल बॅक करा