PNB Housing Finance Limited

एनएसई:

बीएसई:

अंतिम अपडेट:

()
सरासरी रेटिंग
शेअर करा
कॉपी

एनआरआय फिक्स्ड डिपॉझिट उघडण्यापूर्वी लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

give your alt text here

भारत काही मोजक्या देशांपैकी आहे जे ग्लोबल परिस्थितीत फायनान्शियल इन्व्हेस्टमेंटवर उच्च रिटर्न ऑफर करतात आणि फिक्स्ड डिपॉझिट असे एक इन्स्ट्रुमेंट आहे. प्रत्येक दिवसागणिक अनिवासी भारतीयांची (एनआरआय) मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना, अनेकांना त्यांचा कॉर्पस भारतात परत इन्व्हेस्ट करणे फायदेशीर वाटते. फिक्स्ड डिपॉझिटमधील इन्व्हेस्टमेंटला सामान्यपणे कमी जोखीम रिटर्नमुळे आणि मार्केटच्या अस्थिरतेपासून बचाव म्हणून अन्य भारतीय फायनान्शियल इन्स्ट्रुमेंटमध्ये सहसा प्राधान्य दिले जाते.

बँका, कॉर्पोरेट्स आणि हाऊसिंग फायनान्स कंपनीज (एचएफसी) सारख्या अनेक फायनान्शियल इन्स्टिट्यूशन अनिवासी भारतीयांना फिक्स्ड डिपॉझिट ऑफर करतात. कॉर्पोरेट्स आणि एचएफसी द्वारे ऑफर केलेला इंटरेस्ट रेट सामान्यपणे बँकांच्या तुलनेत जास्त असतो.

आता आपण एनआरआयसाठी फिक्स्ड डिपॉझिट इन्व्हेस्टमेंटच्या आवश्यक गोष्टींवर येऊ. असे ट्रान्झॅक्शन करताना, एनआरआय अर्जदारांना खालील गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

  • अर्जदारांना लक्षात ठेवणे आवश्यक आहे की ते केवळ भारतीय कॉर्पोरेट्स आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्यांद्वारे त्यांच्या नॉन-रेसिडेन्ट ऑर्डिनरी (एनआरओ) अकाउंटद्वारे ऑफर केलेल्या फिक्स्ड डिपॉझिटमध्येच इन्व्हेस्ट करू शकतात. त्याचप्रमाणे, मॅच्युरिटीच्या वेळी कमवलेला कॉर्पस केवळ त्यांच्या एनआरओ अकाउंटमध्ये जमा केला जाईल. हे असे अकाउंट आहेत जेथे सर्व ट्रान्झॅक्शन केवळ भारतीय चलनात होतात.
  • पीएनबी हाऊसिंग एफडी मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, एनआरआय अर्जदारांना खालील डॉक्युमेंट्स सादर करणे आवश्यक आहे.
    • फोटो
    • ओळखीचा पुरावा
    • पॅनची कॉपी
    • पत्त्याचा पुरावा
    • पासपोर्टची कॉपी
    • एफएटीसीए फॉर्म
  • एनआरआय कमीतकमी ₹10,000 च्या कॉर्पस सह पीएनबी हाऊसिंगमध्ये एफडी उघडू शकतात. 1 ते 3 वर्षांच्या कालावधीसाठी इन्व्हेस्टमेंट केली जाऊ शकते.
  • डबल टॅक्सेशन अव्हॉयडन्स ॲग्रीमेंट (डीटीएए) मुळे टॅक्स रेट्स 30% पासून ते काही देशांच्या बाबतीत 5% पर्यंत कमी करण्यात आल्यामुळे एनआरआय एफडी अधिकाधिक आकर्षक ठरत आहेत. एनआरआय अर्जदार डीटीएए अंतर्गत येणारे घोषणापत्र दाखल करून लाभ घेऊ शकतात.

कॉर्पोरेट्स आणि हाऊसिंग फायनान्स कंपनीज ऑफर करत असलेला आणखी एक फायदा म्हणजे त्या त्यांच्या कस्टमरना ऑफर करत असलेल्या विविध सर्व्हिसची श्रेणी. विशेषत: पीएनबी हाऊसिंग फिक्स्ड डिपॉझिट कस्टमर पोर्टलद्वारे ॲक्सेस केले जाऊ शकते जिथे तुम्ही लाईव्ह चॅटद्वारे कंपनी अधिकाऱ्यांशी बोलू शकता. या फीचरद्वारे ऑटो रिन्यूवल आणि अकाउंट स्टेटमेंट (एसओए) सुद्धा शोधता येऊ शकतात.

जर तुम्ही एनआरआय असून तुमचे भारतीय इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट्समध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचे प्लॅनिंग असेल आणि किमान जोखमीसह खात्रीशीर रिटर्न हवे असतील, तर कॉर्पोरेट्स आणि एचएफसीद्वारे ऑफर केलेले एफडी खरोखरच चांगली निवड असू शकतात !!

होम लोन मंजुरी, वेळ फक्त
3 मिनिटे, त्रास-मुक्त!

पीएनबी हाऊसिंग

जाणून घेण्यासाठी अन्य विषय

Request Call Back at PNB Housing
कॉल बॅक करा