‘होम लोन पात्रता मूल्यांकन करताना किंवा लोनचा इतर कोणताही प्रकार घेताना 'सिबिल स्कोअर' किंवा क्रेडिट स्कोअर अत्यंत महत्त्वाचा होतो. अर्जदारांनी त्यांची पात्रता, त्यांना आकारण्यात येईल तो आरओआय समजून घेण्यासाठी त्यांचा स्कोअर तपासणे आणि तो एका विशिष्ट नंबरपेक्षा जास्त आहे का ते शोधणे आणि त्यानुसार त्यांचे लोन प्लॅन करणे आवश्यक आहे. माहिती नसलेल्यांना, सिबिल स्कोअर महत्त्वाच्या व्यावसायिक परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांसारखे वाटू शकते. परंतु असे नाही. ते, खरं तर, अर्जदाराच्या पत पात्रतेचे मूल्यांकन असते.
तर, सिबिल स्कोअर काय आहे, तो कसा काम करतो आणि होम लोन च्या बाबतीत तो महत्त्वाचा का आहे? आपण खालील ब्लॉगमध्ये या विषयाला विस्तृतपणे हाताळू.
सिबिल स्कोअर म्हणजे काय?
सिबिल स्कोअर हा तीन अंकी नंबर असतो जो अर्जदाराचा क्रेडिट रेकॉर्ड आणि कामगिरी दर्शवितो. हा 300-900 दरम्यान असतो. ज्या अर्जदाराचा स्कोअर जास्त असतो तो लेंडर्ससाठी कमी जोखीमीचा ठरतो. अशा प्रकारे, सिबिल स्कोअर जितका जास्त असेल तितका अर्जदार क्रेडिटसाठी योग्य असतो. हे शेवटी कोणत्याही दिलेल्या लोनच्या विनंतीसाठी - अगदी होम लोनसाठीही अधिक पात्रतेमध्ये रूपांतरीत होते.
तीन अंकी सिबिल स्कोअर चांगला समजण्यासाठी, प्रथम सिबिल म्हणजे काय हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
- सिबिल म्हणजे क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेड - भारतीय रिझर्व्ह बँकद्वारे परवाना दिलेली क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनी.
- सिबिल ही भारतातील सर्वात जुनी क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे आणि अमेरिकन ट्रान्सयुनियन मल्टीनॅशनल ग्रुपचा भाग आहे.
- अत्यावश्यकपणे, लोन आणि व्यक्ती आणि बिझनेसच्या क्रेडिट ट्रान्झॅक्शनचे रेकॉर्ड संकलित करण्यासाठी आणि राखण्यासाठी सिबिलने बँक आणि फायनान्शियल सर्व्हिस प्रदात्यांशी टाय-अप केले आहे.
- हे क्रेडिट रेकॉर्ड संकलित करून, सिबिल संस्थांच्या क्रेडिट कामगिरीचे मूल्यांकन करू शकते - ते खूप जास्त लोन घेत आहेत का, ते लोनवर डिफॉल्ट करत आहेत का इ.
- हा ट्रॅक रेकॉर्ड सिबिलला प्रत्येकासाठी क्रेडिट रेटिंग प्राप्त करण्यास सक्षम करतो जेणेकरून ते भविष्यातील लोनसाठी अप्लाय करतात तेव्हा लेंडर त्याला मंजूर करण्यासाठी किती रिस्क आहे याचे मूल्यांकन करू शकतात.
- सिबिल कडे 600 दशलक्षपेक्षा अधिक कस्टमर आणि 32 दशलक्ष बिझनेसची क्रेडिट माहिती आहे. देशातील लेंडरद्वारे हे सर्वात प्राधान्यित क्रेडिट रेटिंग आहे.
आता सिबिल स्कोअर कसा रेकॉर्ड केला जातो याविषयी अधिक जाणून घेण्याची वेळ आली आहे.
वाचायलाच हवे: होम लोनसाठी चांगला सिबिल स्कोअर काय आहे?
सिबिल रिपोर्ट म्हणजे काय?
सिबिल द्वारे क्रेडिट माहिती कशी संग्रहित आणि रेकॉर्ड केली जाते याचा विचार करीत आहात?? जे सिबिल रिपोर्टद्वारे होते.
- सिबिल रिपोर्ट किंवा क्रेडिट माहिती रिपोर्ट हा व्यक्ती किंवा बिझनेसच्या सर्व क्रेडिट ट्रान्झॅक्शनचा रेकॉर्ड असतो
- यामध्ये मागील आणि चालू लोन, रिपेमेंट आणि कर्ज घेण्याचा रेकॉर्ड, कोणतेही क्रेडिट कार्ड देय, डिफॉल्ट पेमेंट, ईएमआय ट्रान्झॅक्शन इ. यासारखी माहिती समाविष्ट असते.
- याव्यतिरिक्त, सिबिल रिपोर्ट व्यक्तीच्या रोजगार प्रोफाईल तसेच व्यक्तीने केलेल्या लोन चौकशीच्या सर्व घटना देखील संकलित करते. हे अर्जदाराच्या रिपोर्टची तपासणी करणाऱ्या लेंडरला फायनान्शियल प्रोफाईलचे अधिक समग्र दृश्य देते.
- कोणीही अधिकृत सिबिल वेबसाईटवरून सहजपणे सिबिल रिपोर्ट डाउनलोड करू आणि तपासू शकतात. लेंडर नाममात्र फीसाठी त्यांच्या ॲप्स आणि वेबसाईट्सद्वारे ही सुविधा देखील प्रदान करतात.
अशा प्रकारे, सिबिल रिपोर्ट हा लेंडरला हव्या असलेल्या आवश्यक डॉक्युमेंट्सपैकी एक आहे.
सिबिल स्कोअर कसा काम करतो?
आता आपण सिबिल स्कोअरचा अर्थ काय आहे याची चर्चा केली आहे तर, तो कसा कॅल्क्युलेट केला जातो आणि तो कसा काम करतो हे समजून घेण्याची वेळ आली आहे.
सिबिल स्कोअर निश्चित नसतो. व्यक्तीच्या क्रेडिट रेकॉर्ड आणि कामगिरीवर आधारित यात सतत चढउतार होत असते. त्यावर परिणाम करणारे चार घटक पुढीलप्रमाणे:
- पेमेंट रेकॉर्ड – जर कोणतीही व्यक्ती वेळेवर लोन पेमेंट आणि ईएमआय क्लिअर करण्यात अयशस्वी झाली किंवा त्यांच्यावर सातत्याने डिफॉल्ट असेल तर सिबिल स्कोअर कमी होतो.
- क्रेडिट मिक्स – जर अर्जदाराकडे सिक्युअर्ड आणि अनसिक्युअर्ड लोनचे संतुलित मिश्रण असेल तर सिबिल स्कोअर पॉझिटिव्ह राहील. येथे, सिक्युअर्ड लोन ही होम लोन, कार लोन इ. सारखी लोन आहेत, तर अनसिक्युअर्ड लोन ही क्रेडिट कार्ड बिल, पर्सनल लोन इ. आहेत.
- लोन चौकशी – रिपोर्टमध्ये एकाधिक क्रेडिट किंवा लोन नाकारल्याने स्कोअरवर परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे, जर व्यक्तीने अलीकडेच एकाधिक लोन घेतले असतील, तर त्यांचा कर्जाचा भार वाढेल, अशा प्रकारे त्यांच्या क्रेडिट रेटिंगवर नकारात्मक परिणाम होईल आणि लेंडर भविष्यातील लोन विरुद्ध सावध होतील.
- क्रेडिट वापर – क्रेडिट कार्ड बॅलन्स जेवढा जास्त असेल, धारक तेवढा अधिक कर्जामध्ये असेल, अशा प्रकारे त्यांच्या सिबिल स्कोअरवर परिणाम होईल.
प्रत्येक महिन्याला या सर्व पॅरामीटर्सचे मूल्यांकन करून, सिबिल प्रत्येक व्यक्तीसाठी अपडेटेड स्कोअर तयार करते. त्यामुळे, जेव्हा कोणतीही व्यक्ती पुढील लोनसाठी अप्लाय करेल, तेव्हा लेंडर त्यांच्या फायनान्शियल विश्वसनीयतेसाठी ॲप्लिकेशन प्रोसेसमध्ये त्यांच्या नवीनतम सिबिल स्कोअर आणि रिपोर्टचे मूल्यांकन करेल. जर त्यांनी लोनसाठी आवश्यक निकष पास केले तर ते त्वरित मंजूर केले जाईल. अन्यथा, ॲप्लिकेशन नाकारले जाईल किंवा इंटरेस्ट रेट वाढेल.
सिबिल स्कोअरचे महत्त्व - तो का महत्त्वाचा आहे?
- सिबिल स्कोअर हा लोन ॲप्लिकेशन प्रोसेसमध्ये व्यक्तीच्या क्रेडिट पात्रतेचा पुरावा आणि महत्त्वाचा पात्रता निकष आहे.
- सिबिल स्कोअर चांगला असेल तर अर्जदाराच्या मंजुरीची शक्यता चांगली असते. उच्च सिबिल स्कोअर लोनच्या सर्वोत्तम अटी देखील प्राप्त करेल.
- कमी सिबिल स्कोअर भविष्यात कोणतेही लोन प्राप्त करण्याची शक्यता कमी करू शकते.
सर्वोत्तम सिबिल स्कोअर काय आहे?
आपण सर्वांनी चांगला सिबिल स्कोअर असण्याचे महत्त्व जाणून घेतले आहे. परंतु सर्वोत्तम सिबिल स्कोअर काय आहे?
तर, विशिष्ट लोनच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आदर्श सिबिल स्कोअर प्रत्येक लेंडरवर अवलंबून असतो. होम लोनसाठी, 700 किंवा 750 पेक्षा अधिकचा सिबिल स्कोअर आदर्श आहे. अर्थातच, सिबिल स्कोअर जितका जास्त असेल अर्जदाराला तितक्या चांगल्या होम लोन टर्म मिळतील - त्यामध्ये कमी होम लोन इंटरेस्ट रेट्स समाविष्ट आहे. सामान्यपणे, सर्व लेंडरकडे विविध सिबिल स्कोअर श्रेणींसाठी इंटरेस्ट रेट्सचे विविध स्लॅब असतात.
अखेरीस, सर्वोत्तम होम लोन ऑफर प्राप्त करण्यासाठी, शून्य पात्रता समस्यांचा सामना करण्यासाठी आणि जलद लोन ॲप्लिकेशन मंजुरी आणि लोन मंजुरी मिळविण्यासाठी, 800 पेक्षा अधिक सिबिल स्कोअर ठेवणे सर्वोत्तम आहे.
वाचायलाच हवे: तुमचा सिबिल स्कोअर 500 पासून 750 पर्यंत कसा सुधारावा?
निष्कर्ष
चांगला सिबिल स्कोअर राखणे महत्त्वाचे आहे. ते कसे करावे हे येथे दिले आहे:
- पेमेंट आणि ईएमआय बाबत कधीही डिफॉल्ट राहू नका.
- क्रेडिट बॅलन्स आणि कर्ज कमी ठेवा.
- चांगले क्रेडिट मिक्स ठेवा.
- अतिरिक्तपणे लोनसाठी अप्लाय करू नका किंवा क्रेडिट प्राप्त करू नका.
- नेहमीच स्कोअर नियमितपणे तपासा आणि राखा.
- नाकारणे टाळण्यासाठी अप्लाय करण्यापूर्वी पहिल्यांदा सिबिल स्कोअर सुधारा.
पीएनबी हाऊसिंगमध्ये, कोणत्याही त्रासाशिवाय होम लोन घेण्यास मदत करण्यासाठी आम्ही क्रेडिट स्कोअर निकषांमध्ये शिथिलता आणली आहे. विविध सिबिल स्कोअर रेंजसाठी होम लोन इंटरेस्ट रेट पात्रता मूल्यांकन करण्यासाठी ही लिंक तपासा.