PNB Housing Finance Limited

एनएसई:

बीएसई:

अंतिम अपडेट:

()
सरासरी रेटिंग
शेअर करा
कॉपी

होम लोन घेताना सिबिल स्कोअरचे महत्त्व आणि सिबिल स्कोअर कसा सुधारायचा

give your alt text here

जेव्हा तुम्ही तुमच्या फायनान्स संबंधी जबाबदारीने कृती करता आणि वेळेवर तुमचे पेमेंट करता, तेव्हा तुमची विश्वासार्हता, जो की सिबिल स्कोअर आहे, तो सुधारेल आणि त्यामुळे तुमची क्रेडिट पात्रता सुधारेल.

लोनवर घर खरेदी केलेले कोणीही तुम्हाला अप्लाय करण्याचा विचार करण्यापूर्वीच तुमचा सिबिल स्कोअर तपासा म्हणजेच क्रेडिट स्कोअर तपासा असा सल्ला देईल. हा सर्वात महत्त्वाचा सिबिल स्कोअर केवळ क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेड किंवा सिबिलद्वारे लोन अर्जदाराच्या क्रेडिट पात्रतेसाठी नियुक्त केलेले रेटिंग आहे. क्रेडिट ब्युरो जे सिबिल म्हणूनही प्रसिद्ध आहे, संभाव्य कर्जदाराच्या मागील क्रेडिट रेकॉर्ड (लोनचे रिपेमेंट आणि क्रेडिट कार्ड देयकांचे पेमेंट) वर आधारित व्यक्ती आणि व्यावसायिक संस्थांना स्कोअर नियुक्त करते.

  • जर तुम्ही लोनसाठी अप्लाय केले असेल आणि जर ते मंजूर झाले नसेल तर हा लेख तुमचे लोन का मंजूर झाले नाही आणि तसे पुन्हा होऊ नये याची खात्री कशी करावी हे समजावून सांगेल.
  • जर तुम्ही भविष्यात होम लोनसाठी अप्लाय करण्याचा प्लॅन करत असाल, तर तुम्ही पतपात्र आहात याची खात्री करण्यासाठी तुम्हाला काय लक्षात ठेवणे आवश्यक आहे याविषयी तुम्हाला मार्गदर्शन करेल.

लोन ॲप्लिकेशन कधी नाकारले जाते?

लोन ॲप्लिकेशन नाकारले जाण्याची विविध कारणे असू शकतात. हे विस्तृतपणे खालील गोष्टींमध्ये वर्गीकृत केले जाऊ शकते:

खराब पेमेंट रेकॉर्ड — विलंबित पेमेंट करणे किंवा ईएमआय वर डिफॉल्ट करणे हे फायनान्शियल समस्येचे चिन्ह आहे, जे नकारात्मकरित्या पाहिले जातात आणि तुमच्या सिबिल स्कोअरवर परिणाम करतात.

क्रेडिटचा अविवेकी वापर — क्रेडिटचा उच्च वापर तुमच्या स्कोअरवर थेट परिणाम करणार नाही, परंतु तुमच्या वर्तमान बॅलन्समध्ये वाढ हा रिपेमेंट भाराची स्पष्ट सूचना आहे आणि यामुळे तुमच्या स्कोअरवर वाईट परिणाम होऊ शकतो.

अनसिक्युअर्ड लोनचा उच्च शेअर - ऑटो आणि/किंवा पर्सनल लोन सारख्या अनसिक्युअर्ड लोन्सचा तुलनेने उच्च भाग, तुमच्या स्कोअरवर नकारात्मक परिणाम करण्याची शक्यता आहे. सिक्युअर्ड (होम लोन्स) आणि अनसिक्युअर्ड लोन्सचे मिश्रण असणे सर्वोत्तम आहे.

नवीन एकाधिक अकाउंट उघडणे - जर तुम्ही अलीकडेच एकाधिक क्रेडिट कार्डसाठी अप्लाय केले असेल आणि/किंवा पर्सनल लोन अकाउंट्स उघडले असतील तर तुमचा लेंडर तुमच्या नवीन ॲप्लिकेशनकडे अतिशय चिंतेने पाहणार. एकाधिक अकाउंट्स अतिरिक्त कर्जाचा भार दर्शवितात आणि तुमच्या स्कोअरवर नक्कीच परिणाम करतील, ज्यामुळे तुमचे ॲप्लिकेशन नाकारले जाऊ शकते.

अकाउंट बंद करताना निष्काळजीपणा – कधीकधी अकाउंट बंद करताना अकाउंट धारक सर्व औपचारिकता आणि प्रक्रिया पूर्ण करत नाही किंवा नजरचुकीमुळे थोडा बॅलन्स शिल्लक ठेवतो. हे अकाउंट, जे अद्याप अकाउंट धारकाच्या थकित दायित्वांमध्ये दिसत आहे, त्याचा क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होतो.

डिफॉल्टरची हमी देणे – अनेकदा सद्भावना म्हणून आपण मित्र किंवा परिचित व्यक्तीचा हमीदार म्हणून साईन करतो. हमी हा भावनिक नसून फायनान्शियल निर्णय असणे आवश्यक आहे कारण कर्जदाराचे कोणतेही डिफॉल्ट तुमच्या स्कोअरवर प्रतिकूल परिणाम करेल.

तुमच्या क्रेडिट रेकॉर्वडर नकारात्मक टिप्पणी – तुमच्या सिबिल रिपोर्टवर मागील कर्जाच्या संदर्भात 'रिटन ऑफ' किंवा 'सेटल्ड' सारख्या टिप्पणी, लेंडरना वाईट सिग्नल पाठवतात.

तुम्ही तुमचा सिबिल स्कोअर कसा सुधारू शकता?

सिबिल स्कोअर सुधारणे खूपच कठीण असू शकत नाही ; तुम्हाला फक्त खालील मुद्द्यांबद्दल जागरुक असणे आवश्यक आहे.

पेमेंट करा — जेव्हा तुम्हाला वाटत असेल तेव्हा किंवा जेव्हा तुमच्या अकाउंटमध्ये चांगला बॅलन्स असेल तेव्हाच पेमेंट करायचे असे नाही, वेळेवर पेमेंट करणे महत्त्वाचे. विलंबित पेमेंट हे निश्चितच स्वीकारार्ह नाही आणि लेंडरला पसंत पडत नाही.

कमी फायनान्शियल फायदा — तुमचे कर्ज आणि क्रेडिट आवश्यकता किमान ठेवा. कर्जासाठी अप्लाय करण्याची प्रवृत्ती रोखून ठेवणे आवश्यक आहे. तुम्हाला खरोखरच ते लोन हवे आहे का किंवा आवश्यक रक्कम इतर स्त्रोतांकडून उभारली जाऊ शकते का ते स्वत:ला विचारा. जेव्हा तुम्हाला खरोखरच त्याची गरज असेल तेव्हाच लोन घ्या.

मिश्र कर्ज – विविध लोनचे निरोगी मिश्रण राखून ठेवा (होम, पर्सनल, ऑटो इ.). होम लोन (सिक्युअर्ड लोन) कडे झुकते माप फायदेशीर असू शकतो. तथापि, बॅलन्स अत्यंत विषम झालेला नाही याची खात्री करा.

ते योग्य ठेवा – काही चुकीच्या माहितीमुळे किंवा नजरचुकीमुळे, जर तुमच्या पर्सनल अकाउंट किंवा क्रेडिट कार्ड रेकॉर्डमध्ये चुका असल्यास, त्वरित लेंडरशी संवाद साधा आणि हे दुरुस्त करण्याची खात्री करा; अन्यथा तुमची कोणतीही चूक नसताना तुमच्या क्रेडिट स्कोअरवर वाईट परिणाम होईल.

जॉईंट अकाउंट पेमेंटवर डिफॉल्टला अनुमती देऊ नका आणि त्यांच्या पेमेंटवर डिफॉल्ट होऊ शकणाऱ्या व्यक्तीला हमी देऊ नका - अशा कृती तुमच्या कोणत्याही स्वत:च्या अकाउंटवर नॉन-पेमेंट म्हणून तुमच्या सिबिल स्कोअरचे नुकसान करू शकतात.

तुमचे होम लोन तुमचा सिबिल स्कोअर सुधारू शकते का?

याचे उत्तर आश्चर्यकारक असू शकते ; परंतु होय, होम लोन तुमचा सिबिल स्कोअर सुधारू शकते. कोणतेही सिक्युअर्ड लोन (होम लोन) तुमचा सिबिल स्कोअर सुधारेल आणि अनसिक्युअर्ड लोन (ऑटो लोन, पर्सनल लोन इ.) तुमचा स्कोअर कमी करेल. यामागे असलेले तर्कशास्त्र खूपच सोपे आहे ; सिक्युअर्ड लोन्स सामान्यपणे ॲप्रीसिएट होणारी मालमत्ता तयार करण्याकडे जातात, तर अनसिक्युअर्ड लोन डेप्रीसिएट होणाऱ्या मालमत्तेच्या पेमेंटकडे जाते.

त्यामुळे, जर तुम्ही होम लोन घेण्याचे प्लॅनिंग करत असाल तर तुम्ही योग्य आणि पारदर्शक लेंडर निवडणे महत्त्वाचे आहे. कमी सिबिल स्कोअरमुळे तुमचे होम लोन नाकारले गेले असल्यास लेंडरने तुम्हाला कळवण्याची जबाबदारी स्वीकारावी.

होम लोन मंजुरी, वेळ फक्त
3 मिनिटे, त्रास-मुक्त!

पीएनबी हाऊसिंग

जाणून घेण्यासाठी अन्य विषय

Request Call Back at PNB Housing
कॉल बॅक करा