प्रत्येकाला आयुष्यात कधीतरी घर खरेदी करायची इच्छा असते. स्वतःचे घर असणे ही स्थिर जीवनाची निशाणी मानली जात असल्याने, प्रत्येकजण ते मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतो. वाढत्या रिअल इस्टेटच्या किमतीसह, प्रत्येकालाच घर खरेदी करणे परवडेल असे नाही. म्हणूनच ते त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी होम लोन घेतात. फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स विविध अर्जदारांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विविध प्रकारचे होम लोन प्रदान करतात.
उदाहरणार्थ, एका व्यक्तीला घर खरेदी करण्यासाठी लोनची आवश्यकता असू शकते, तर दुसऱ्याला त्याचे रिनोव्हेशन करण्यासाठी लोनची आवश्यकता असू शकते. परिणामस्वरूप, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सकडे विविध प्रकारच्या होम लोनची तरतूद आहे.
जर तुम्हाला होम लोनसाठी अप्लाय करायचे असेल तर तुमच्यासाठी कोणता होम लोन प्रकार सर्वोत्तम आहे हे जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग वाचा:
भारतात ऑफर केलेले होम लोनचे विविध प्रकार पुढीलप्रमाणे
तुम्ही तुमच्या गरजा आणि बजेटवर आधारित विविध हाऊसिंग फायनान्स पर्यायांमधून निवडू शकता. लक्षात ठेवा की होम लोनसाठी अप्लाय करण्यापूर्वी, तुम्हाला होम लोन पात्रता आणि होम लोन डॉक्युमेंटेशन आवश्यकतांची माहिती असणे आवश्यक आहे.
होम लोन खरेदी
होम लोन प्रशस्त फ्लॅट, रो हाऊस किंवा बंगला खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न साकारू शकते. हे लोन नवीन किंवा पूर्व-मालकीचे घर खरेदी करण्याची इच्छा असलेल्यांना आर्थिक मदत करते. पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड वेतनधारी व्यक्तींसाठी 8.25%* प्रति वर्ष आणि स्वयं-रोजगारित अर्जदारांसाठी 8.10%* प्रति वर्ष इतक्या कमी रेट पासून सुरू होणारे आकर्षक इंटरेस्ट रेट्स ऑफर करते.
वाचायलाच हवे: होम लोन म्हणजे काय? हाऊसिंग लोन विषयी तुम्हाला माहित असायला हवे असे सर्वकाही
होम कन्स्ट्रक्शन लोन
नावाप्रमाणेच, होम कन्स्ट्रक्शन लोन हे अशा व्यक्तींसाठी आहे ज्यांना आधीच बांधलेले घर खरेदी करण्याऐवजी त्यांचे स्वतःचे घर बांधण्याची इच्छा आहे. पीएनबी हाऊसिंग अर्जदारांच्या बजेट आणि कन्स्ट्रक्शन गरजांसाठी तयार केलेले होम कन्स्ट्रक्शन लोन ऑफर करते. या लोनसह, तुम्ही तुमचे घर संपूर्ण फायनान्शियल स्वातंत्र्यासह बांधू शकता आणि 30 वर्षांच्या सुविधाजनक कालावधीमध्ये त्याचे रिपेमेंट करू शकता.
होम इम्प्रुव्हमेंट लोन
होम इम्प्रुव्हमेंट लोन विविध प्रकारच्या होम लोनमध्ये लोकप्रिय आहे कारण हे घराचे रिनोव्हेशन, दुरुस्ती किंवा रिफर्बिश करण्यासाठी घेतले जाऊ शकते. यामध्ये सामान्यपणे संपूर्ण रिनोव्हेशन, अपग्रेडेशन, बाह्य आणि आंतरिक पेंट किंवा दुरुस्ती, टायलिंग, फ्लोअरिंग, प्लंबिंग, इलेक्ट्रिकल काम, लाकूडकाम इ. साठी कव्हरेज समाविष्ट असते.
होम एक्सटेंशन लोन
तुमचे कुटुंब वाढत असताना तुम्ही तुमचे प्रेम, वेळ आणि तुमच्या बजेटचाही विस्तार करता. परंतु तुमच्या घराबद्दल काय? तुम्हाला तुमचे मूल, त्यांची अभ्यासाची खोली किंवा तुमच्या लायब्ररीसाठी तुमच्या विद्यमान घरात जास्त जागेची आवश्यकता असू शकते. अशा प्रकरणात तुमचे घराचा विस्तार करण्यासाठी तुम्ही होम एक्सटेंशन लोन घेऊ शकता.
प्लॉट लोन
प्लॉट लोन्स तुम्हाला निवासी प्लॉट फायनान्स करण्याची अनुमती देते. पीएनबी हाऊसिंगने प्लॉटच्या किंमतीच्या जवळपास 70-75% फायनान्स करते. तथापि, प्लॉट लोन्सवरील इंटरेस्ट रेट्स खरेदीसाठीच्या हाऊस लोन्सपेक्षा थोडे जास्त आहेत.
वाचायलाच हवे: होम लोन मंजूर होण्यासाठी किती वेळ लागेल?
nri home loan
अनिवासी भारतीय (एनआरआय) आणि भारतीय वंशाची व्यक्ती (पीआयओ) नवीन घर खरेदी करण्यासाठी किंवा जुने घर दुरुस्त करण्यासाठी होम लोन देखील निवडू शकतात. अर्जदाराकडे एनआरआय म्हणून त्यांच्या भारतीय मूळ किंवा स्टेटसचा कायदेशीर पुरावा असणे आवश्यक आहे. तसेच, त्यांच्याकडे परदेशात किमान एक वर्षाचा कामाचा अनुभव असावा.
निष्कर्ष
होम लोन हे एक लोन आहे जे तुम्हाला तुमचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न साकार करण्याची अनुमती देते. पीएनबी हाऊसिंग तुमच्या सर्व हाऊसिंग गरजा पूर्ण करण्यासाठी विविध प्रकारची होम लोन्स प्रदान करते. संपूर्ण भारतभर ब्रँच नेटवर्क, घरपोच सेवा, जलद मंजुरी आणि डिस्बर्समेंट, समर्पित टीम, पारदर्शकता आणि स्पर्धात्मक इंटरेस्ट रेट्स सह, पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड तुमचे स्वप्नातील घर मिळविणे सोपे आणि जलद करते.