PNB Housing Finance Limited

एनएसई:

बीएसई:

अंतिम अपडेट:

()
सरासरी रेटिंग
शेअर करा
कॉपी

ईएमआय म्हणजे काय? ईएमआय ची व्याख्या आणि तो कसा कॅल्क्युलेट केला जातो?

give your alt text here

होम लोन तुम्हाला तुमचे स्वतःचे घर घेण्याचे तुमचे स्वप्न साकारण्यास मदत करते. होम लोन ईएमआय (समान मासिक इंस्टॉलमेंट) च्या स्वरूपात त्याच्या स्वत:च्या आर्थिक वचनबद्धतेसह येते. हे ईएमआय तुम्हाला लोनच्या कालावधीमध्ये निष्ठापूर्वक भरावे लागतील. तुम्ही तुमच्या मासिक ईएमआय वचनबद्धता आणि लोन कालावधी दरम्यान चांगले संतुलन साधणे महत्त्वाचे आहे.

आता प्रथम, ईएमआय म्हणजे काय?

ईएमआय ही तुम्ही तुमच्या लोन दायित्वांची पूर्तता करण्यासाठी लेंडरकडे भरता अशी मासिक पेमेंटची एक मालिका आहे. इंटरेस्ट रेट्समध्ये मोठा बदल नसल्यास किंवा तुम्ही लोन प्रिन्सिपलचा भाग प्रीपेमेंट केला असल्यास ही रक्कम लोनच्या कालावधीवर बऱ्यापैकी स्थिर राहते. ईएमआय हे लोनच्या प्रिन्सिपल रिपेमेंट आणि त्यावरील इंटरेस्टचे कॉम्बिनेशन आहे. लोनच्या आधीच्या वर्षांमध्ये, इंटरेस्ट ईएमआयचा प्रमुख घटक बनते. तथापि, प्रत्येक ईएमआय पेमेंटसह प्रिन्सिपल रक्कम कमी होत असल्याने हे प्रमाण हळूहळू काळानुसार उलट होते.

 

लोनच्या आधीच्या वर्षांमध्ये ईएमआयची रचना

लोनच्या नंतरच्या वर्षांमध्ये ईएमआयची रचना

 

वाचायलाच हवे: लोन रिपेमेंट शेड्यूल म्हणजे काय व ते कसे कॅल्क्युलेट करतात?

लोन रिपेमेंट कालावधी ईएमआयवर कसा परिणाम करतो?

लोन रिपेमेंट कालावधी आणि तुमच्या ईएमआयचा आकार व्यस्तपणे संबंधित आहे. म्हणजे, तुम्ही तुमचे लोन रिपेमेंट करण्यासाठी जितका अधिक वेळ घेता, तितकी दिलेल्या लोन रक्कम आणि इंटरेस्ट रेटसाठी ईएमआय च्या बाबतीत मासिक वचनबद्धता कमी असेल आणि त्याउलट.

उदाहरणार्थ, ₹50 लाखांचे होम लोन हे 30 वर्षांच्या कालावधीत देय करणे म्हणजे तुम्ही मासिक ₹43,694 ईएमआय 9.95% इंटरेस्ट रेटने देय करणे होय. तथापि, तुम्ही कालावधी 20 वर्षांपर्यंत कमी करणे म्हणजे लोन रिपेमेंटचा विस्तार कमी कालावधी पर्यंत मर्यादित करणे. तुमच्या मासिक ईएमआय मध्ये ₹48,086 पर्यंत वाढ होईल :

लोन कालावधी ईएमआय ₹@ 9.95% इंटरेस्ट रेट
5 वर्ष 1,06,112
10 वर्ष 69,937
15 वर्ष 53,577
20 वर्ष 48,086
25 वर्ष 45,259
30 वर्ष 43,694

प्रश्न हा आहे की रिपेमेंट कालावधी आणि ईएमआय भार दरम्यान तुम्ही चांगले संतुलन कसे साधता

ईएमआय भार आणि इंटरेस्ट खर्चामध्ये संतुलन साधताना विचारात घेण्याचे घटक

  • तुमचे वय: लेंडर तुम्हाला रिटायर होण्यापूर्वी तुमचे लोन रिपेमेंट करण्याची अपेक्षा करतो. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या 20s च्या उत्तरार्धात किंवा 30s च्या सुरुवातीच्या काळात असाल तर तुमचे वय दीर्घ कालावधी निवडण्यात फायदेशीर भूमिका बजावू शकते.
  • उत्पन्न आणि अतिरिक्त: तुमचे वर्तमान खर्च आणि दायित्व विचारात घेतल्यानंतर तुम्ही आरामात भरू शकत असलेला मासिक ईएमआय निवडा. तुम्ही आरामात भरू शकत असलेल्या या कॅल्क्युलेटेड होम लोन ईएमआय वर आधारित तुम्ही कालावधी निवडू शकता.
  • तुमच्या जीवनाचा टप्पा: जर तुम्ही पालक होण्याचे प्लॅनिंग करत असाल आणि तुमचा अंदाज असेल की तुमचा मासिक खर्च वाढणार आहे. तर तुम्ही दीर्घ कालावधी आणि कमी ईएमआय निवडणे निश्चितच शहाणपणाचे आहे. जेव्हा तुमच्याकडे अतिरिक्त रक्कम असेल तेव्हा तुम्ही नेहमीच प्रीपेमेंट करू शकता ज्यामुळे तुमचे लोन रिपेमेंट दायित्व कमी होते. त्याचप्रमाणे, जर तुम्ही निवृत्तीच्या जवळ असाल तर तुम्हाला ईएमआय आणि कालावधी समायोजित करावा लागेल जेणेकरून तुमचे लोन तुम्ही निवृत्त होण्याच्या वेळी रिपेड केले जाईल.
  • प्रीपेमेंट कलम: विचार करण्याचा आणखी महत्त्वाचा घटक आहे प्रीपेमेंट. जर तुमचा लेंडर कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय कितीही वेळा प्रीपेमेंटला अनुमती देत असेल, तर तुम्ही दीर्घ कालावधी निवडू शकता आणि तुमच्या होम लोन कालावधीच्या प्रारंभिक टप्प्यात ईएमआय भार कमी करू शकता. जेव्हा जेव्हा, अतिरिक्त असते, तेव्हा तुम्ही लोनचे प्रीपेमेंट करू शकता. प्री-पेमेंट तुमच्या प्रिन्सिपल रकमेवर समायोजित होत असल्याने तुमची प्रिन्सिपल रक्कम जलद रेटने कमी होते. अशा प्रकारे तुमचा मासिक ईएमआय किंवा लोन कालावधी कमी होतो.

वाचायलाच हवे: तुमच्या होम लोनवरील इंटरेस्टचा बोजा कसा कमी करावा (4 सोप्या टिप्स)

निष्कर्ष

आपण हे सांगून निष्कर्ष काढू शकतो की जर तुम्ही आयुष्याच्या अशा टप्प्यात असाल जिथे तुम्ही जास्त लोन कालावधी घेऊ शकता ज्याचा परिणाम कमी ईएमआय मध्ये होतो, तर तुम्ही तोच पर्याय निवडावा. प्रीपेमेंट कलम अतिशय सुलभ पर्याय असल्याचे सिद्ध होते जे तुम्हाला कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय कितीही प्रीपेमेंट करण्याची परवानगी देते. यामुळे तुम्हाला कमी ईएमआय भरण्याची संधी मिळतेच. पण तुमच्याकडे अतिरिक्त रक्कम असेल तेव्हा तुमचे दायित्व कमी करण्याचीही परवानगी मिळते.

होम लोन मंजुरी, वेळ फक्त
3 मिनिटे, त्रास-मुक्त!

पीएनबी हाऊसिंग

जाणून घेण्यासाठी अन्य विषय

Request Call Back at PNB Housing
कॉल बॅक करा