PNB Housing Finance Limited

एनएसई:

बीएसई:

अंतिम अपडेट:

()
सरासरी रेटिंग
शेअर करा
कॉपी

कॉर्पोरेट फिक्स्ड डिपॉझिट – लाभ, टॅक्स आणि सुरक्षितता

give your alt text here

फिक्स्ड डिपॉझिट हे सर्वसाधारण पणे एफडी म्हणून ओळखले जातात. चांगले रिटर्न देऊ करण्याच्या बदल्यात निर्धारित कालावधीसाठी पैसे इन्व्हेस्ट करण्यासाठी साधनांपैकी एक आहे.

कॉर्पोरेट्स आणि हाऊसिंग फायनान्स कंपनीज (एचएफसी) ऑफर केलेल्या एफडी ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या सेगमेंट साठी पूर्व-निर्धारित इंटरेस्ट रेट आणि विशेष योजना देखील प्रदान करतात. याद्वारे संस्थांना फंड उभारणी आणि अन्य भागांत बिझनेसच्या हेतूने इन्व्हेस्टमेंट करण्यास मदत मिळते आणि ठेवीदारांना त्यांच्या इन्व्हेस्टमेंट वर इंटरेस्ट अर्निंग्सची शाश्वती मिळते.

इन्व्हेस्टर काही घटकांच्या बाबतीत संदिग्ध असू शकतात जसे की कॉर्पोरेट एफडी की इक्विटी, म्युच्युअल फंड की अगदी बँक एफडी ऐवजी एचएफसीद्वारे ऑफर केलेल्या फिक्स्ड डिपॉझिट्स मध्ये इन्व्हेस्टमेंटचा काय फायदा होऊ शकतो का? कितपत सुरक्षित आहेत आणि याद्वारे प्राप्त होणाऱ्या अर्निंग्स वर टॅक्स आकारणी केली जाते का? चला उत्तरे जाणून घेऊया..

कॉर्पोरेट एफडी मध्ये इन्व्हेस्टमेंटचे लाभ:

  • कॅपिटल मार्केट रिस्क आणि अनिश्चितता यामुळे संदिग्ध असणाऱ्यांसाठी फिक्स्ड डिपॉझिट हा सर्वाधिक सुरक्षित इन्व्हेस्टमेंटचा पर्याय ठरतो. एफडी रेट मधील कोणताही बदल केवळ नवीन इन्व्हेस्टरला प्रभावित करेल. त्यातही, कॉर्पोरेट्स आणि एचएफसीद्वारे ऑफर केलेल्या फिक्स्ड डिपॉझिट बँक एफडीपेक्षा तुलनेने जास्त इंटरेस्ट प्रदान करतात. पीएनबी हाउसिंग एफडी रेट्स साठी, येथे क्लिक करा
  • इन्व्हेस्टरला काळजी करण्याची मुळीच आवश्यकता नाही. कारण त्यांच्या ठेवी ठराविक वर्षांसाठी लॉक केलेल्या असतात. ज्या दरम्यान ते त्यांच्या पसंतीच्या गैर-संचयी इंटरेस्ट पेमेंटची निवड करू शकतात — मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक — किंवा संचयी, जिथे प्रिन्सिपल रक्कम आणि एकूण इंटरेस्ट मॅच्युरिटी वेळी अदा केले जाते
  • फिक्स्ड डिपॉझिटची क्षमता कम्पाउंडिंग मध्ये असते. जिथे कालावधीमध्ये कमावलेले पैसे पुन्हा इन्व्हेस्ट केले जातात
  • अनेक डिपॉझिट घेणारे कॉर्पोरेट हाऊसेस आणि हाऊसिंग फायनान्स कंपनीज कस्टमरला निर्दोष सेवा देणाऱ्या ब्रोकर्स आणि रिलेशनशिप मॅनेजर्सच्या देशभरातील विस्तृत नेटवर्कद्वारे फिक्स्ड डिपॉझिट प्रदान करतात.. पीएनबी हाऊसिंगसह, तुम्ही अकाउंट स्टेटमेंटचा लाभ घेण्यासाठी, शंका नोंदविण्यासाठी आणि त्यांच्या कस्टमर पोर्टलद्वारे लाईव्ह चॅटद्वारे अधिकाऱ्यांशी बोलू शकता. कोणत्याही त्रासाशिवाय तुमच्या डिपॉझिटचे ऑटोमॅटिकरित्या रिन्यूवल करण्यासारखे फीचर देखील उपलब्ध आहे.

सुरक्षा:

  • सर्व कंपन्या आणि एचएफसी भारतात डिपॉझिट ऑफर करू शकत नाही. शिखर संस्थेच्या द्वारे संस्थांना अर्ज करण्यासाठी परवाना जारी केले जातात. त्यानंतरच ते जनतेकडून डिपॉझिट स्वीकारू शकतात
  • विविध घटकांनुसार कॉर्पोरेट एफडी आणि एचएफसी द्वारे ऑफर केलेल्या कॉर्पोरेट एफडी साठी क्रेडिट रेटिंग एजन्सीद्वारे रेटिंग दिले जाते. 'AAA' किंवा उच्च स्तरावर रेटिंग असलेले फिक्स्ड डिपॉझिट सुरक्षेची उच्च पातळी दर्शविते आणि इन्व्हेस्टरद्वारे विचारात घेतले जाऊ शकतात. पीएनबी हाऊसिंग फिक्स्ड डिपॉझिटचे क्रेडिट रेटिंग जाणून घेण्यासाठी, येथे क्लिक करा
  • एफडी या सुरक्षित इन्व्हेस्टमेंट म्हणून विचारात घेतले जाते, तथापि, कोणत्याही किरकोळ जोखीम कमी करण्यासाठी व्यवहार अंमलबजावणी करण्यापूर्वी कंपनीच्या मूलभूत गोष्टी, वित्तीय, प्रतिष्ठा आणि ब्रँड व्हिंटेजसह क्रेडिट रेटिंग पडताळणे आवश्यक आहे

टॅक्स दायित्व:

  • बँक एफडी प्रमाणेच, कॉर्पोरेट एफडी आणि एचएफसीद्वारे ऑफर केलेल्या फिक्स्ड डिपॉझिट वरील इंटरेस्ट देखील ठेवीदाराच्या सर्वोच्च इन्कम टॅक्स ब्रॅकेटमध्ये टॅक्स पात्र आहेत.. तथापि, जर डिपॉझिटमधून वार्षिक इंटरेस्ट उत्पन्न ₹5,000 पेक्षा जास्त असेल तरच इन्व्हेस्टरला टॅक्स भरावा लागेल.

कंपन्या आणि एचएफसी द्वारे ऑफर केलेल्या एफडी विविध लाभ आणि रिटर्नच्या उत्कंठावर्धक रेटने परिपूर्ण पैज ठरु शकते. किमान जोखमीचा विचार समोर ठेऊन विविध भारतीय इन्व्हेस्टमेंटचे पर्याय अजमाविले जातात. तथापि, तुमच्या पसंतीचे फिक्स्ड डिपॉझिट निवडण्यापूर्वी सुयोग्य रिसर्च करणे निश्चितच महत्वाचे ठरते.

होम लोन मंजुरी, वेळ फक्त
3 मिनिटे, त्रास-मुक्त!

पीएनबी हाऊसिंग

जाणून घेण्यासाठी अन्य विषय

Request Call Back at PNB Housing
कॉल बॅक करा