स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणे ही एक गोष्ट आहे आणि प्रत्यक्षात खरेदी करणे ही दुसरी गोष्ट आहे, कारण त्याच्याशी संलग्न दायित्व असतात, विशेषत: जर तुम्ही होम लोन घेत असाल. याचा अर्थ असा की अनेक वर्षे लोन रिपेमेंट करण्यासाठी तुमच्या मासिक सॅलरीचा काही भाग वापरणे. तुम्हाला लोन परवडणार आहे हे ठरवल्यानंतर, तुम्हाला इतर बाबींकडे पाहणे आवश्यक आहे, जसे की तुमच्यासाठी पात्र लोन रक्कम, फायनान्शियल इन्स्टिट्यूशनची कस्टमर सर्व्हिस कार्यक्षमता आणि फिक्स्ड किंवा फ्लोटिंग होम रेट पर्याय.
होम लोन पात्रता म्हणजे काय?
होम लोन पात्रता ही कमाल लोन रक्कम आहे जी तुम्ही तुमच्या वर्तमान उत्पन्न आणि रिपेमेंट क्षमतेवर आधारित मिळण्याची आशा करू शकता. यात लोन, कालावधी आणि इंटरेस्ट रेटच्या आकारमानावर देखील विचार केला जातो. फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स सामान्यपणे ईएमआय एकूण टेक-होम पेच्या 60 टक्के पर्यंत मर्यादित करण्याचा सल्ला देतात, हे गृहीत धरून की इतर कोणतेही चालू दायित्व नाहीत. हे खरेदीदाराला त्याच्या किंवा तिच्या मासिक खर्चासाठी पुरेसे डिस्पोजल उत्पन्न ठेवण्यास मदत करते.
पात्रता ही वय, पूर्वीचे लोन, क्रेडिट रेकॉर्ड , रिपेमेंट ट्रॅक रेकॉर्ड, विद्यमान लोन दायित्व आणि निवृत्तीचे वय यासारख्या इतर घटकांद्वारे देखील निर्धारित केली जाते.
वाचायलाच हवे: होम लोनला त्वरित मंजुरी कशी मिळवावी?
तुमची होम लोन पात्रता वाढविण्याचे 3 सर्वोत्तम मार्ग
1. जॉईंट पद्धतीने अप्लाय करणे
जर तुम्ही पती / पत्नी, मुलगा किंवा मुलगी यासारख्या जवळच्या कुटुंबातील सदस्यांसह जॉईंट होम लोन साठी अप्लाय केले तर पात्रता मोठ्या प्रमाणात सुधारते. याचे कारण पात्रता निर्धारित करताना संयुक्त अर्जदाराचे उत्पन्न विचारात घेतले जाते.
2. अन्य लोन बंद करणे
जर तुमच्याकडे अन्य लोन असेल तर तुम्ही प्री-पेमेंटद्वारे शॉर्ट-टर्म लोन बंद करण्याचा विचार करू शकता, जेणेकरून तुम्ही जास्त होम लोन साठी पात्र व्हाल. घर खरेदी करणे हा एक वेळचा व्यवहार असल्याने, इच्छित लोन रकमेची तडजोड करणे अर्थपूर्ण ठरते. तसेच, पात्रता वाढविण्यासाठी तुम्ही 25 वर्षांपर्यंत दीर्घ लोन कालावधी निवडू शकता आणि जेव्हा अतिरिक्त निधी उपलब्ध असतात तेव्हा प्रीपेमेंट करा.
3. उच्च क्रेडिट स्कोअरसाठी तुमचे देय क्लिअर करा
तसेच, जर तुमच्याकडे तुमच्या क्रेडिट स्कोअरवर प्रतिकूल परिणाम होऊ शकणारे कोणतेही प्रलंबित पेमेंट किंवा डिफॉल्ट असेल तर ते क्लिअर करण्याचा आणि नंतर होम लोनसाठी अप्लाय करण्याचा काटेकोरपणे सल्ला दिला जातो. क्रेडिट स्कोअर खरेदीदाराद्वारे रिपेमेंट क्षमता आणि पेमेंटचा सारासार विचार याचा अंदाज घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो.
त्यामुळे, होम लोनमध्ये पात्रता हा एक महत्त्वाचा घटक असताना, तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी मोठे आणि चांगले घर खरेदी करण्यात त्याचा अडथळा येऊ देऊ नका.
लेखक : शाजी वर्गीस
(लेखक पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि बिझनेस हेड आहेत)