लीडरशीप टीम
एनएसई: ₹ ▲ ▼ ₹
बीएसई: ₹ ▲ ▼ ₹
अंतिम अपडेट:
-
english
सर्च करा ऑनलाईन पेमेंट
-
लोन प्रॉडक्ट्स
-
हाऊसिंग लोन
-
अन्य होम लोन
-
-
रोशनी लोन्स
-
अफोर्डेबल हाऊसिंग
-
- फिक्स्ड डिपॉझिट
-
कॅल्क्युलेटर
-
तुमच्या फायनान्शियल स्थितीची माहिती
-
तुमच्या फायनान्सचे व्यवस्थापन
-
अतिरिक्त खर्चाचे कॅल्क्युलेशन
-
-
नॉलेज हब
-
इन्व्हेस्टर्स
-
इन्व्हेस्टर संपर्क
-
कॉर्पोरेट गव्हर्नन्स
-
लेटेस्ट @ पीएनबी हाऊसिंग
-
-
आमच्याविषयी
-
व्यवस्थापन
-
प्रेस
-
कर्मचारी
-
- आमच्याशी संपर्क साधा
आम्ही पीएनबी हाऊसिंग आहोत
पीएनबी हाऊसिंग
लीडरशीप टीम
गिरीश कौसगी हे आमच्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहेत. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स अँड ट्रेडमधून बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये एक्झिक्युटिव्ह मास्टर्स डिप्लोमा प्राप्त केला आहे. त्यांना फायनान्शिअल सर्व्हिस क्षेत्रात 21 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. यापूर्वी, ते कॅन फिन होम्स लिमिटेडमध्ये मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून कार्यरत होते, तसेच त्यांनी टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये क्रेडिट अँड रिस्कचे रिटेल हेड म्हणून तर आयडीएफसी बँक लिमिटेडमध्ये एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट आणि आयसीआयसीआय बँक लिमिटेडमध्ये जॉईंट जनरल मॅनेजर म्हणूनही काम केले आहे. पीएचएफएल होम लोन्स अँड सर्व्हिसेस लिमिटेड आणि पीएचएफएल फाउंडेशन या आमच्या उपकंपन्यांच्या बोर्डवर ते डायरेक्टर म्हणूनही काम करीत आहेत. ऑक्टोबर 21, 2022 पासून त्यांची आमच्या बोर्डवर नियुक्ती करण्यात आली.
विनय गुप्ता हे आमच्या कंपनीचे चीफ फायनान्शियल ऑफिसर आहेत. ते ऑक्टोबर 26, 2022 रोजी आमच्या कंपनीमध्ये रुजू झाले. आमच्या कंपनीमधील एकूण फायनान्स, ट्रेजरी आणि इन्व्हेस्टर संबंधी कामांची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. त्यांनी दिल्ली युनिव्हर्सिटीतून कॉमर्स डिग्रीची परीक्षा पास केली आहे. ते इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे सदस्य आहेत. यापूर्वी, ते एसबीआय कार्ड आणि पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेड, जीई कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड आणि प्राईस वॉटरहाऊस सोबत कार्यरत होते.
अमित सिंह हे आमच्या कंपनीचे चीफ पीपल ऑफिसर आहेत. ते डिसेंबर 1, 2021 रोजी आमच्या कंपनीमध्ये रुजू झाले. ह्युमन रिसोर्स, लर्निंग आणि डेव्हलपमेंटद्वारे आमच्या कंपनीतील लोकांच्या धोरणाला मॅनेज करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. ते सीएसआर आणि प्रशासकीय कामांचे प्रमुख देखील आहेत. त्यांनी चौधरी चरण सिंह युनिव्हर्सिटी, मेरठ येथून बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमधून डिग्री आणि आयसीएफएआय बिझनेस स्कूल, आयसीएफएआय युनिव्हर्सिटीतून बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर्स डिग्री मिळवली आहे. यापूर्वी, ते एसबीआय फंड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडसह कार्यरत होते.
जातुल आनंद हे आमच्या कंपनीचे चीफ क्रेडिट आणि कलेक्शन ऑफिसर आहेत. ते आमच्या कंपनीमध्ये जून 19, 2013 रोजी रुजू झाले. आमच्या कंपनीतील रिटेल बिझनेसच्या क्रेडिट अंडररायटिंग आणि कलेक्शनची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे दिल्ली युनिव्हर्सिटीची कॉमर्सची डिग्री आहे आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्सचा कोर्स त्यांनी पूर्ण केला आहे. ते इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे 2002 पासून सदस्य आहेत. यापूर्वी, ते आयसीआयसीआय बँक लिमिटेड आणि स्टँडर्ड चार्टर्ड बँकेत कार्यरत होते.
अजय कुमार मोहंती हे आमच्या कंपनीच्या इंटर्नल ऑडिटचे हेड आहेत. 1 जुलै 2020 रोजी ते आमच्या कंपनीत रुजू झाले. त्यांच्याकडे आमच्या कंपनीच्या इंटर्नल ऑडिटच्या फंक्शनची जबाबदारी आहे. त्यांनी उत्कल युनिव्हर्सिटीतून कॉमर्समध्ये बॅचलर्स डिग्री मिळवली असून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबादमधून सिनिअर मॅनेजमेंट प्रोगाम पूर्ण केला आहे. ते इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे 1989 पासून सदस्य आहेत. त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियामधून इन्फॉर्मेशन सिस्टीम ऑडिटमधील पोस्ट क्वालिफिकेशन कोर्सही पूर्ण केला आहे. ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्सचे प्रमाणित असोसिएट आहेत. यापूर्वी, ते आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड आणि आयसीआयसीआय बँक लिमिटेडमध्ये कार्यरत होते.
अनुजय सक्सेना हे आमच्या कंपनीचे बिझनेस हेड- अफोर्डेबेल बिझनेस आहेत. ते मे 3, 2021 रोजी आमच्या कंपनीत रुजू झाले. आमच्या कंपनीच्या बिझनेस ट्रान्सफॉर्मेशनची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. मोहनलाल सुखादिया विद्यापीठ, उदयपूर येथून त्यांनी सायन्समध्ये पदवी मिळवली आणि नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमधून बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (ॲडव्हर्टायझिंग अँड कम्युनिकेशन मॅनेजमेंट) मध्ये मास्टर्स डिग्री मिळवली. यापूर्वी, ते आयसीआयसीआय बँक लिमिटेड आणि पाईन लॅब्स प्रायव्हेट लिमिटेडसह कार्यरत होते.
श्रीमती वीणा जी कामत 53 वर्षांच्या आहे. त्यांनी बिझनेस मॅनेजमेंट (बीबीएम) आणि लॉ (एलएलबी) मध्ये पदवी संपादन केली आहे. त्या वर्ष 2008 पासून इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाच्या (आयसीएसआय) सदस्य आहेत.
त्यांच्याकडे ऑक्टोबर 1998 पासून कॅन फिन होम्स लिमिटेडसह दीर्घकालीन संबंध होते. आपल्या कार्यकाळ दरम्यान कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी होत्या (मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी) आणि त्यांनी अनुपालन सुनिश्चित केले. विविध धोरणांचा मसुदा निर्मिती केली. रेग्युलेटर्स सोबत विचारविनिमय केला आणि अनुपालन सक्षमतेसाठी काम केले. त्यांनी विविध विभागांचे नेतृत्व देखील केले आहे आणि त्यांना लीगल, बोर्ड सचिवालय, टॅक्स आकारणी इत्यादींमध्ये व्यापक अनुभव होता आणि त्यांनी कॉर्पोरेट गव्हर्नन्समध्ये कौशल्य मिळवले. त्यांनी गेल्या काही वर्षांत संस्थेतील ऑफिसर ते डेप्युटी जनरल मॅनेजर पर्यंत पदोन्नती मिळवली होती. त्यापूर्वी त्या आयसीडीएस लिमिटेडमध्ये कार्यरत होत्या, एक हायर परचेस आणि लीजिंग कंपनी (1995-1998). त्यांनी मैसूरमधील न्यायालयांमध्ये सिव्हील लॉची प्रॅक्टिस देखील केली होती (1992-1995).
दिलीप वैथीस्वरण हे कंपनीच्या रिटेलचे चीफ सेल्स ऑफिसर आहेत. ते लेंडिंग साईडवर प्राईम आणि उदयोन्मुख मार्केट बिझनेस आणि फर्मसाठी डिपॉझिट बिझनेसचे नेतृत्व करतात. त्यांच्याकडे फर्मसाठी बिझनेस इंटेलिजन्स आणि ॲनालिटिक्स फंक्शन देखील आहे. त्यांच्याकडे बिझनेस स्ट्रॅटेजी, प्रॉडक्ट आणि पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, सेल्स आणि डिस्ट्रीब्यूशन आणि पी अँड एल मॅनेजमेंटमधील रिटेल लेंडिंग व्यवसायाचा 15+ वर्षांचा अनुभव आहे. ते एप्रिल 2023 मध्ये आमच्या कंपनीमध्ये सहभागी झाले. कंपनीच्या रिटेल व्यवसायाची वाढ आणि नफ्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. त्यांनी अन्ना विद्यापीठ, चेन्नई येथून यांत्रिक अभियांत्रिकीमध्ये पदवी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड, नवी दिल्ली येथून बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. आमच्यासोबत काम सुरू करण्यापूर्वी, ते ॲक्सिस बँक लिमिटेडसह कार्यरत होते.
कृष्ण कांत हे कंपनीचे मुख्य अनुपालन अधिकारी आहेत आणि डिसेंबर 2023. पासून संस्थेशी निगडीत आहेत. अनुपालनाच्या क्षेत्रात अनुभवी व्यावसायिक आहेत आणि त्यांचा बीएफएसआयमध्ये दोन दशकांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. पीएनबी हाऊसिंग फायनान्समध्ये, संपूर्ण संस्थेमध्ये अनुपालन कार्यक्रम प्रभावी आणि कार्यक्षम असल्याची खात्री करण्यासाठी नियामक अनुपालन यंत्रणेचे नेतृत्व करणे, मानके प्रस्थापित करणे आणि प्रक्रियेची अंमलबजावणी करणे हे त्यांचे मुख्य काम आहे. पीएनबी हाऊसिंगमध्ये सहभागी होण्यापूर्वी त्यांनी बंधन बँक आणि कॅनरा बँक मध्ये सेवा बजावली आहे.
त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ मँचेस्टर, यूके मधून आयसीए डिप्लोमा इन गव्हर्नन्स, रिस्क अँड कम्प्लायन्स केला असून इंटरनॅशनल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, नवी दिल्ली येथून एक्झिक्युटिव्ह पीजीडीएम पूर्ण केले आहे. ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स, मुंबईचे सर्टिफाईड असोसिएट देखील आहेत.
अंशुल दलेला आमच्या कंपनीच्या कस्टमर सर्व्हिस आणि ऑपरेशन्सचे हेड आहेत. 11 नोव्हेंबर 2016 रोजी ते आमच्या कंपनीमध्ये रोजी रुजू झाले. त्यांच्याकडे आमच्या कंपनीच्या ब्रँच ऑपरेशन्स आणि कस्टमर सर्व्हिसची जबाबदारी आहे. त्यांनी राजस्थान युनिव्हर्सिटी, जयपूर येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिग्री प्राप्त केली तर राजस्थान युनिव्हर्सिटी, जयपूर येथून त्यांनी बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर्स डिग्री प्राप्त केली आहे. यापूर्वी, ते जेनवर्थ फायनान्शियल मॉर्गेज गॅरंटी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि आयसीआयसीआय बँक लिमिटेडमध्ये कार्यरत होते.
अनुभव राजपूत हे आमच्या कंपनीचे चीफ इन्फॉर्मेशन ऑफिसर आहेत. 12, एप्रिल 2022 रोजी ते आमच्या कंपनीत रुजू झाले. त्यांच्याकडे आमच्या कंपनीचे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि डिजिटल उपक्रम हाताळण्याची जबाबदारी आहे. त्यांनी चौधरी चरण सिंह युनिव्हर्सिटी, मेरठ येथून कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर डिग्री आणि एस.पी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चमधून इन्फॉर्मेशन मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा पूर्ण केला आहे. यापूर्वी, ते चोलामंडलम एमएस जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेड आणि निवा बुपा हेल्थ इन्श्युरन्स कंपनी लिमिटेड (पूर्वी मॅक्स बुपा हेल्थ इन्श्युरन्स लिमिटेड म्हणून ओळखली जाणारी) कंपनीत कार्यरत होते.
वल्ली सेकर या आमच्या कंपनीच्या अफोर्डेबल सेक्शनच्या चीफ सेल्स आणि कलेक्शन ऑफिसर आहेत. 6 जून 2022 रोजी त्या आमच्या कंपनीमध्ये रुजू झाल्या. त्यांच्याकडे आमच्या कंपनीच्या अफोर्डेबल सेगमेंटच्या सेल्स, बिझनेस डेव्हलपमेंट आणि कलेक्शन्सची जबाबदारी आहे. त्यांनी तिरुनेलवेली येथील मनोनमानियम सुंदरनार युनिव्हर्सिटीतून कॉमर्समध्ये बॅचलर्स डिग्री मिळवली. यापूर्वी, त्या मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेडमध्ये कार्यरत होत्या.
विकास राणा हे कन्स्ट्रक्शन फायनान्स बिझनेसचे प्रमुख आहे. ते आमच्या कंपनीमध्ये जून 18, 2024 रोजी सहभागी झाले. रिस्क कॅलिब्रेटेड हाय रिटर्न कन्स्ट्रक्शन आणि रिअल्टी फायनान्स बिझनेस तयार आणि मॅनेज करण्यासाठी ते जबाबदार आहेत. त्यांनी एनएम कॉलेज, मुंबई येथून बी.कॉम, आयसीडब्ल्यूए, कोलकाता येथून आयसीडब्ल्यूए आणि आयसीएफएआय, हैदराबाद येथून सीएफए पूर्ण केले आहे. आयसीआयसीआय बँक लिमिटेड येथे कन्स्ट्रक्शन आणि रिअल्टी फंडिंग बिझनेसमध्ये 13+ वर्षांसह बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्टरमध्ये त्यांच्याकडे 30+ वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी आयसीआयसीआय बँक लि., आयडीबीआय बँक लि., व्हीएलएस फायनान्स लि. सह यापूर्वी रिअल इस्टेट फंडिंग, एसएमई लेंडिंग, कॅपिटल मार्केट्स, कॉर्पोरेट बँकिंग, गव्हर्न्मेंट बिझनेस आणि इन्व्हेस्टमेंट बँकिंगसह विविध भूमिकेत काम केले आहे.
भव्य तनेजा हे नॅशनल हेड - मार्केटिंग आहेत. 15 जुलै 2019 रोजी ते आमच्या कंपनीत रुजू झाले. मार्केटिंग डोमेनमध्ये व्यापक स्पेक्ट्रम कव्हर करणाऱ्या 16 वर्षांपेक्षा जास्त करिअरसह. संस्थेच्या धोरणात्मक मार्केट स्थितीला परिभाषित करणे, ब्रँड मॅनेजमेंटवर देखरेख करणे, सार्वजनिक संबंध मॅनेज करणे आणि आउटबाउंड संपर्क सेंटरद्वारे डिजिटल मार्केटिंग धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी ते जबाबदार आहेत. त्यांच्याकडे आयआयएम इंदौर कडून डिजिटल मार्केटिंग आणि स्ट्रॅटेजी मध्ये सर्टिफिकेट प्रोग्राम, मार्केटिंगमध्ये पोस्ट-ग्रॅज्युएट डिप्लोमा आणि कॉमर्समध्ये बॅचलर डिग्री आहे. त्यांच्या मागील कार्यकाळात, ते आयआयएफएल वेल्थ अँड ॲसेट मॅनेजमेंट, एचएसबीसी, कोटक महिंद्रा बँक आणि कोटक लाईफ इन्श्युरन्सशी संबंधित होते.
नीरज मनचंदा हे कंपनीचे चीफ रिस्क ऑफिसर आहेत. 15, एप्रिल 2013 रोजी ते आमच्या कंपनीत रुजू झाले. आमच्या कंपनीमधील एकूण रिस्क मॅनेजमेंटची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. त्यांनी दिल्ली युनिव्हर्सिटीतून कॉमर्स डिग्रीची परीक्षा पास केली आहे आणि आयसीएफएआयएएन बिझनेस स्कूलमधून बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा पूर्ण केला आहे. यापूर्वी, ते हॅबिटॅट हाऊसिंग फायनान्स लिमिटेडसोबत कार्यरत होते.
त्वरित होम लोन मंजुरी मिळवा
तुमच्या समर्पित रिलेशनशिप मॅनेजरकडून कॉल मिळवा
त्वरित होम लोन मंजुरी मिळवा
तुमच्या समर्पित रिलेशनशिप मॅनेजरकडून कॉल मिळवा
आम्ही या नंबरवर ओटीपी पाठविला आहे: +91 .
तुमच्या भेटीसाठी धन्यवाद, आमचे प्रतिनिधी तुम्हाला कॉल करतील.
पीएनबी हाऊसिंग विषयी






तुम्ही स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद! आमचे प्रतिनिधी लवकरच आपल्याशी संपर्क साधतील
कॉलबॅक ची विनंती
ओटीपी पडताळा
आम्ही या नंबरवर ओटीपी पाठविला आहे: +91 .
कृपया खाली एन्टर करा.